महाराष्ट्र वेदभुमी

परंपरेला आधुनिकतेची साथ : बाळा पोवार डीजे यांच्या अत्याधुनिक डिजिटल साऊंड सिस्टीमचा भव्य उदघाटन

 

माणगाव–(नरेश पाटील) : दि. ०६ डिसेंबर २०२५ संगीतप्रेमातून साकारलेल्या आधुनिक तांत्रिक उपक्रमाला औपचारिक रूप देत युवा कार्यकर्ते महेश पोवार उर्फ बाळा डीजे यांच्या निवास प्रांगणात अत्याधुनिक डिजिटल म्युझिकल साऊंड इको सिस्टीमचा खासगी अनावरण सोहळा उत्साहात पार पडला... महेश पोवार यांच्या व्यक्तिगत आवडीतून आणि तांत्रिक जाणिवेतून उभारण्यात आलेल्या या उच्च क्षमतेच्या साऊंड सेटअपने त्यांच्या संगीत-प्रेमाला एक नवे आधुनिक स्वरूप लाभले आहे...

  निवडक मान्यवर, निकटवर्तीय आणि निमंत्रित पाहुण्यांच्या सान्निध्यात हा सोहळा अत्यंत सुसज्ज, आनंददायी आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला... परंपरेतील पूजाविधी आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यांचा उत्तम समन्वय या प्रसंगी अनुभवायला मिळाला...

  या अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचे उद्घाटन माणगाव नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष व सध्या वॉर्ड क्र. १६ चे प्रतिनिधी सदस्य ज्ञानदेव पोवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले... उद्घाटनाची सुरुवात मान्यवरांचा शुभ हस्ते नारळ अर्पण करून शानदार उदघाटन करण्यात आला...  त्यापूर्वी पोवार कुटुंबीयांनी विधिवत पूजाविधी करून या आधुनिक प्रणालीचा मंगलारंभ केला...

  समारंभाला कुटुंबीय, नातेवाईक, जवळचे मित्र परिवार, युवा ग्रामस्थ आणि विशेष निमंत्रित मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीने हजेरी लावून कार्यक्रमाला वैभव प्राप्त करून दिले... यामध्ये प्रामुख्याने मा. ज्ञानदेव पोवार, काशीराम पोवार सह पोलीस पाटील नथुराम पोवार, समाजसेवक बाळा संतोष मांजरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण पोवार, तसेच मारुती मालोरे, रामदास पोवार, वैभव पोवार, सचिन मांजरे, समीर पोवार, निकेश पोवार, शुभम शिंदे होते... त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याचे औपचारिक सौंदर्य अधिक खुलून आले...

   याप्रसंगी ज्ञानदेव पोवार यांनी महेश पोवार यांच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, “खासगी वापरासाठी इतक्या प्रगत दर्जाच्या डिजिटल साऊंड तंत्रज्ञानाचा अवलंब करून महेश बाळा डीजे पोवार यांनी आपल्या उत्साहाला आधुनिकतेची जोड दिली आहे, हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे,” असे उद्गार काढत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला...

  या अत्याधुनिक डिजिटल साऊंड सिस्टीमच्या स्थापनेमुळे महेश पोवार यांनी संगीत क्षेत्रातील स्वतःच्या आवडीचे नवीन पर्व सुरू केले आहे... आगामी काळात त्यांच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना, खासगी समारंभांना आणि संगीतप्रेमी मैफिलींना या तंत्रसज्ज प्रणालीमुळे विशेष आकर्षक आयाम प्राप्त होणार आहेत, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला...

Post a Comment

Previous Post Next Post