प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- तालुक्यातील मौजा मौदी येथे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या स्व. अशोक राधेश्याम उईके यांच्या कुटुंबीयांची माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी सांत्वनपर भेट घेतली... स्व. अशोक उईके यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे... या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला... त्याचबरोबर या भागातील वाघांचे दिवसेंदिवस वाढणारे हल्ले लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील व आवश्यक ती मदत करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले... यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्य कैलास राउत व कुटुंबीय आदी उपस्थीत होते...
