महाराष्ट्र वेदभुमी

गोफण गावचे आण्णा गेले.. प्रितम जाधव यांना पितृशोक...

 


प्रतिनिधी नंदेश किसन गायकर.. रोहा तालुक्यातील मौजे गोफण येथील रहिवासी श्री. भास्कर नानू जाधव यांचं काल तारीख 07डिसेंबर 2025रोजी सकाळी आकस्मिकरीत्या वृद्धापकाळाने निधन झाले आहे...

      सर्वांना आण्णा नावाने प्रचलित असलेल्या भास्कर जाधव यांनी आपल्या गावच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला... एक विश्वासू आणि प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे आपले आण्णा होय... गोफण येथील प्रितम जाधव आणि रमेश जाधव यांना पितृशोक. गोफण गावच्या प्रत्येक माणसाला आणि शेजारील भागीरथीखार गावच्या प्रत्येक माणसाच्या परिचयाचे आण्णा माणुसकीचा निर्मल झरा होते...

    त्यांची दोन्ही मुले आजही त्यांच्यासारखी प्रेमळ आणि विश्वासू आहेत... माणुसकी आणि आदर त्यांच्या वडिलांच्या सारखे गुण त्यांच्या अंगी आहेत...आण्णा श्री भास्कर जाधव यांच्या पश्चात त्यांना मुले, मुली, जावई, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post