पुगांव रोहा :-(नंदकुमार कळमकर) सन २०२४ च्या शिक्षक भरती मध्ये लागलेल्या शिक्षक बांधवांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १२ शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेले दुःखाचे डोंगर याबाबतचा खूप खेद वाटत आहे. यासाठी दिवंगत शिक्षण सेवक बांधवांस श्रद्धांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षण सेवक यांच्या वतीने रोहा तालुक्यातील रोहा मारुती चौक येथे २५ एप्रिल रोजी शांततापूर्ण असे कॅन्डलमार्च मौन मोर्चाचे आयोजन करण्यात आले व काढण्यात येणार आहे यासाठी दिवंगत शिक्षण सेवक यांच्या सर्व सहकारी मित्र शिक्षण सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा शिक्षण सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे...
राज्यात झालेल्या शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कॅन्डलमार्च मौन मोर्चा जिल्ह्यातील तमाम शिक्षण सेवक यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून याबाबतचे निवेदन गट शिक्षणाधिकारी रोहा, रोहा तहसीलदार ,पोलीस निरीक्षक रोहा,आणि मुख्याधिकारी रोहा नगरपरिषद,यांना देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण सेवक शोभा खांडेकर यांनी दिली आहे...
आमचे सहकारी शिक्षणसेवक कै.प्रशांत तांबे (सिंधुदुर्ग) याचे नुकतेन अकाली निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन स्मृतीस चिरशांती लाभो यासाठी रायगड जिल्ह्यातील २०० हून अधिक शिक्षणसेवक यांची उपस्थित राहणार असून रोहा शहरात एक शांततामय 'कॅन्डलमार्च'मौन मोर्चा आयोजित करण्यात आले असून दिवंगत शिक्षण सेवकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे,..
शनिवारी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता रोहा शहरातील मारुती चौक ते शिव छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असे या कॅन्डलमार्च मौन मोर्चाचे स्वरूप असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले असून यासाठी अथवा यशस्वितेसाठी शोभा खांडेकर, कल्याणी भोसले, प्रशांत अहिरराव, शिवकुमार माने,निवृत्ती शिंदे,रणजीत मिरगणे,स्वप्निल पाटील, अतुल बोंद्रे,प्रभाकर तुपे,मयूर पाटील,शिवशंकर डांगे, अथक परिश्रम घेत आहेत...
प्रतिक्रिया
संपूर्ण महाराष्ट्रात १२ शिक्षण सेवकांचा अकाली निधन हे दुःख मनाला अत्यंत वेदना दायक आहे. ते शिक्षण सेवा करत असताना अचानक निघून गेल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डलमार्च पूर्णपणे मौन पाळून आणि शांततेत काढण्यात येईल, वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्णतः दक्षता घेतली जाणार आहे,तसेच प्रशासनाने सदर सामाजिक व भावनिक बाब विचारात घेऊन यासाठी सहकार्य करावे असे निवेदन देखील देण्यात आले असून अत्यंत दक्षता पूर्वक आणि शांततेत मौन बाळगून हा कॅन्डलमार्च मौन मोर्चातून आमचे सहकारी दिवंगत शिक्षण सेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे शिक्षणसेवक प्रतिनिधी शोभा खांडेकर यांनी सांगितले.
