महाराष्ट्र वेदभुमी

सुरत रेल्वे स्टेशनवर स्थलांतरीत कामगाराची गावी जाण्यासाठी झुंबड; 1 व्यक्ती मृत,अनेकजण जखमी..

मुंबई प्रतिनिधी:( सतिश पाटील):सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या प्रचंड गर्दीमुळे भगदड सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, जिथे रेल्वे पकडण्यासाठी हजारो लोकांची झुंबड उडाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, ज्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समोर आले आहे.

सुरत भगदड (एप्रिल २०२६) - मुख्य कारण उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि नियोजनाचा अभाव यामुळे प्लॅटफॉर्म आणि स्टेशनच्या बाहेर २ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. प्रवासी १५-१६ तास रांगेत थांबले होते...परिणामी गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, काही प्रवासी बेशुद्ध पडल्याचेही वृत्त होते...पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी पांगवली, मात्र लाठीचार्जचे वृत्त प्रशासनाने नाकारले आहे...

महत्वाची टीप: सुरत स्टेशनवर यापूर्वीही, विशेषतः दिवाळीच्या काळात, अशा गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत.शनिवारी व रविवारी विषेश ट्रेन ची सोय होती पण सुट्टी व लग्नसराई असल्यामुळे गर्दी अवाक्याबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीत एक वक्तीचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय...

Post a Comment

Previous Post Next Post