ब्रेथ ॲनालायझरमुले ड्रंक अँड ड्राइव्हवर लगाम घातला जाईल तर बॅरिकेड्स रस्त्यावरील अनियंत्रित वाहन प्रवेश रोकतील. सद्गुरूंच्या शिकविणीचे छान विचार रुजविताना प्रतिष्ठानचे प्रमुख डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी म्हणाले की सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे छान विचार रुजवले तर चांगली कामे होतात. माणसा माणसात प्रेम, आपुलकी व आपलेपणा वाढतो.यामुळे देश, राज्य, जिल्हा, तालुका गाव एकसंध होऊन गुण्यागोविंदाने जगता येते. हा उपक्रम तरुणांना प्रेरणा देईल की प्रत्येकाने सेवा हीच खरी ऋण मानून पुढाकार घ्यावा. गाव पातळीवर अशा चळवळींमुळे सामाजिक एकता वाढेल व भविष्यात निसर्ग सुरक्षेसाठीही उपक्रम राबवणार आहोत. श्री उमेश धर्माधिकारी म्हणाले की सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने सेवा हीच खरी ही शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणत आहोत यामुळे पोलीस बंधूंचे कार्य सुलभ होईल व नागरिकांमध्ये रस्ता शिस्तीचा संस्कार होईल. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल म्हणाल्या प्रतिष्ठानच्या या दानशिलतेमुळे रायगड पोलीस दलाची क्षमता नक्कीच वाढेल. ही केवळ उपकरणे नाहीत तर सामाजिक जबाबदारीचा संदेश आहे. अशा चांगल्या विचारांनी सर्वजण एकत्र येऊया. हा उपक्रम रायगड जिल्ह्यातील सामाजिक जागृतीचा मैलाचा दगड ठरणार आहे. सर्वांनी सद्गुरुंच्या शिकवणीप्रमाणे प्रेम, सेवावृत्तीने वागलो तर करा स्वच्छंद विकास होईल...
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण : सद्गुरूंच्या शिकविणेने प्रेरित उपक्रमाने एकतेचा संदेश डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने रायगड पोलीस दलास मोठे योगदान.. ५१५ बॅरिकेड्स व १६ ब्रेथ ॲनालायझर मशीनचे वाटप करण्यात आले हा उपक्रम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणीचा जिवंत आढावा घेणारा आहे. देश मला काय देतो? यापेक्षा मी या देशाचे काहीतरी देणे लागतो. देशाचे समाजाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत ह्या विचाराने प्रेरित होऊन प्रतिष्ठान जनमानसात सेवाभावना रुजवत आहे. डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी श्री उमेशदादा धर्माधिकारी व श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांना सदर वस्तू सुपूर्त करण्यात आल्या या उपकरणामुळे ट्रॅफिक सुरक्षितता व अपघात नियंत्रण मजबूत होईल.
