महाराष्ट्र वेदभुमी

रोहा बस स्थानकाच्या आवारात बसखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू

रोहा :- दिवसेंदिवस विविध ठिकाणी एसटी बसच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली दिसून येत आहे. शुक्रवारी ८.१५ च्या सुमारास रोहा बस स्थानक आवारात एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावरून बस गेल्याने  त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे...

शुक्रवार  दि. ४ जुलै रोजी धनगर आळी (रोहा) येथील मनोहर नाखरेकर (वय वर्षे ६५) हे रोहा बाजारपेठ, एस टी स्टॅण्ड आणि धनगर आळी हा परिसर तसा जवळच असल्याने नेहमीप्रमाणे बाजारात आले होते. बस स्थानकामधून घरी परत जात असताना रात्रौ ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. बस  स्थानकामध्ये येणाऱ्या सातारा वाई महाबळेश्वर महाड मार्गे रोहा एसटीबस क्र एम एच १४ / के . क्यु ३९७०  हिरकणी बस चा चालक याने एस टी बस भरधाव वेगाने.., हयगाईने, निष्काळजीपनाने अविचाराने चालवून रोहा एसटी स्थानकात उभ्या असलेल्या  मनोहर नाखरेकर यांना जोरदार ठोकर दिली... त्या ठोकरीत त्यांना गंभीर दुखापत होऊन बसचा पुढील चाक नाखरेकर यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला... सदर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. बस स्थानकात  मनोहर नाखरेकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजतात  स्थानिक नागरिकांच्या पोलिसांच्या मदतीने ॲम्बुलन्स मध्ये उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल करण्यात आले. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात कॉ. गु.र.नं -१३६/२०२५ भारतीय न्याय सहिता १०६(१), २८१,१२५ (अ) (ब) मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपविभागीय अधिकारी रविंद्र दौडकर, पोलीस निरिक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस अधिक तपास करत आहेत....

Post a Comment

Previous Post Next Post