महाराष्ट्र वेदभुमी

मुनवली येथे विकासकामांचे भूमिपूजन संपन्न,

सोगाव - अब्दुल सोगावकर :अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे गावातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायतीच्या विशेष फंडातून सिमेंटचे ठोकले(पेव्हर ब्लॉक) बसवणे व मुनवली क्रिकेट मैदानावर आसनव्यवस्था(स्टेडियम) बांधणे या कामांचे रविवार दि.१९ एप्रिल २०२६ रोजी मापगाव माजी सरपंच सुनिल थळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले.

    या विकासकामांसाठी मुनवली येथील रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी मापगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे तर स्टेडियम बांधण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून सदर कामे मंजूर करून आणली असल्याबद्दल माजी सरपंच सुनिल थळे यांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व युवा नेते सूचित थळे यांचे विशेष कौतुक केले आहे...

   यावेळी केशव चांदोरकर सर, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, माजी सदस्य लाईक कप्तान, किशोर सातमकर, माजी सदस्या सानिका घाडी, दिलीप मोंढे, संतोष बांद्रे, संजय अनमाने, अजित हरवडे सर, संदेश पाटील, गंगाराम ठकरुळ, सुधाकर मल्हार, सुरेश हाके, सतीश घाडी, अक्षय जाधव, विजय सोनावणे, मधुकर सूद, रुपेश अनमाने, सुरेश हाके, अमोल हाके, संदेश पाटील, दयाराम म्हात्रे, किसन सलग, समिर ठकरूळ, अहिल्या अनमाने, मुनावर कुर, सुलचोना मोंढे, निर्मला पंडम, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी तसेच सोगाव, मुनवली तसेच मापगाव पंचक्रोशीतील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन :- मुनवली येथे विकासकामांचे भूमिपूजन करताना उपस्थित मान्यवर ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post