अलिबाग प्रतिनिधी (स्वाती जाधव): अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथे शनिवार दि. ८ आँगस्ट सकाळी ९.०० वाजता भरधाव वेगाने मुंबईकडे जाणारी रेनोल्ड कार ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने डायरेक्ट जाऊन शेतामध्ये पलटी झाली असल्याची घटना घडली आहे... ज्या शेतामध्ये रेनोल्ड कार पलटी झाली आहे त्या शेताची लावणी झाली असल्यामुळे शेतमालकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येते...
गाडी पलटी झाली तेव्हा गाडीमध्ये गाडी चालक व साईडला बसलेला व्यक्ती प्रसंग अवधानाने सुखरूप आहेत... परिणामी गाडीला बराच मार असल्याचे दिसून येते... ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला आणि गाडी पलटी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दिसून येते...
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व या दोघांना बाहेर काढण्यास मदत केली... पोलिसांना बोलविण्यात आले... आणि अपघातग्रस्तांना किरकोल दुखापत असल्यामुळे प्रथमउपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले...
