राजकीय कार्यसम्राट प्रतिनिधी कुठे असतात अशावेळी?
मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील)
विषय : पाणी गळती बाबत गेल्या अनेक दिवस नेहरू रोड मुलुंड पश्चिम पूजा हॉस्पिटल समोर रस्त्यावर पाईपलाईन मधून पाणी गळती होत होती. अनेक वाहन चालक घसरून अपघात होत होते व रस्त्यावर पाणी सांडल्यामुळे चिखलमय व घाण पाण्यातून लोकांना जाता येता नाहक त्रास होत होता...याबाबत 1 डिसेंबर 2025 ला श्री. सतीश पाटील (मुंबई पत्रकार) सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार तक्रार देऊन पाठपुरावा केला तक्रार" s" विभाग नंबर :072136996 तसेच मुलुंड " t"वार्ड तक्रार नंबर:6866 केली होती... त्या अनुषंगाने"t"वार्ड मधून कर्मचाऱ्यांनी जागेवर येऊन पाहणी करून गेले व दोन दिवसात काम करू अशी ग्वाही दिली... तसेच दुसऱ्या दिवशी"s "वार्ड मधून देखील फोन द्वारे काम करून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली तरी हे काम 7 तारखेला पूर्ण करून दिले तरी दोन्ही विभागाचे धन्यवाद. मग प्रश्न हा पडतो की मुलुंडमधील कार्यसम्राट पदवीवाले लोकप्रतिनिधी निवडून दिलेले फक्त बॅनरबाजी पुरते का? मतदान आले की वर्षभर झोपलेले कार्यसम्राट जागे होतात मुलुंडमध्ये रस्त्याची खूप गंभीर समस्या आहे, तसेच सरकारी आरोग्य हॉस्पिटल ची सुविधा अनेक वर्ष रखडली आहे, आजही मुलुंड बाहेर रुग्ण घेऊन जावे लागते,मुलुंड स्टेशनचे ब्रिजचे काम धीम्म्या गतीने चालू आहे, तसेच मुलुंड पूर्व पश्चिम जाण्यासाठी वाहनाचा रस्ता अजून बनला नाही खूप फेरा मारून मुलुंड पूर्व पश्चिम ला जावे लागते. मुलुंड चे लोकप्रतीनिधी यांच्यामार्फत समाजकार्य व लोकांच्या समस्या का दूर केल्या जात नाहीत???
