महाराष्ट्र वेदभुमी

दुर्दैवी! थ्रेशर मशीनमध्ये अडकून चालकाच्या मृत्यू

प्रतिनिधी : सचिन चौरसिया 

रामटेक :-  रामटेकजवळील डोंगरी येथे धान काढणीच्या कामादरम्यान थ्रेशर मशीनमध्ये अडकून मशीन चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवार (दि.८) डिसेंबरला दुपारी  घडली... मंगेश चौधरी (वय ३५, रा. महाराजपूर) असे मृताचे नाव आहे. शेतकरी श्रावण ठाकरे यांच्या शेतात धान काढणीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली... मंगेश चौधरी हे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक असून, थ्रेशर मशीन चालविण्याचे कामही ते करीत होते... कामादरम्यान मशीनमधून निघणाऱ्या धानात तनस मिसळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले... त्यासाठी त्यांनी मशीन बंद करून ऍडजस्ट करण्यास सुरुवात केली...

परंतु मशीन बंद केल्यानंतरही काही सेकंद पाते फिरत असतात... हीच वेळ धोकादायक ठरली... मंगेश ऍडजस्ट करत असताना ते धान टाकण्याच्या जागेतून मशीनमध्ये पडले... पाय मशीनमध्ये अडकताच त्यांचे शरीर आत ओढले गेले आणि त्यांना गंभीर जखमा झाल्या... पाहताच पाहता त्यांचा जागीच मृत्यू झाला... घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला... मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला... या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post