कोलाड (श्याम लोखंडे) : उद्योग व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या ब्लॅक अँड वॉच कंपनी यांच्या सीएसआर च्या माध्यमातून तसेच ऐतिहासिक गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यशस्वी असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने खांब परिसरातील दुर्गम आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबियांना थंडी दिवसात लागणारे उबदार पांघरूण म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे...
गेले अनेक महिने दुर्गवीर प्रतिष्ठानवर असलेल्या विश्वासाने दुर्गवीर सोबत ब्लॅक अँड वॉच ही नामांकित कंपनी सीएसआर उपक्रमासाठी जोडली गेलेली आहे... या कंपनीच्या सीएसआर अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात घेरासुरगड येथे वृक्षारोपण, रायगड जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये डिजिटल बोर्ड वितरण असे उपक्रम घेण्यात आले आहेत या उपक्रमांनंतर खांब पंचक्रोशीतील नडवली आदिवासी पाडा येथे यांच्या सहकार्यातून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले...
तर येथील एकूण ८० गरजू कुटुंबांना वाटप याचे करण्यात आले... गडसंवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान कार्यरत असताना देणगीदार तसेच सीएसआर उपक्रम अंतर्गत जोडल्या जाणाऱ्या नामांकित कंपन्या यांच्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान अधिक कटिबद्ध होत आहे...
या आगळ्या वेगळ्या राबविण्यात आलेल्या उपक्रमाप्रसंगी खांब ग्राम पंचायतीचे माजी सरपंच, तथा खांब विभागीय कुणबी समाज अध्यक्ष रामचंद्र चितळकर, माजी सरपंच मनोज शिर्के, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थिटे, सरपंच सुरेखा पारठे, रंजना टवले, मनिषा चितळकर, वैजनाथ गावचे पोलीस पाटील मनोज सावरकर, जितेंद्र पारठे, योगेश टवले, कोलाड पोलिस सहायक अधिकारी नरेश पाटील माजी सरपंच तथा उपसरपंच सरपंच चंद्रकांत जाधव,पवार, सदानंद जाधव सह ब्लॅक अँड वॉच कंपनी तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे आदी आदिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे सहसचिव प्रशांत वाघरे,स्थानिक दुर्गवीर किशोर अर्जुन सावरकर कृष्णाराम धनवी सर, महेंद्र पार्टे, सृष्टी पारठे, किरण गायकर आणि मुंबईहून दुर्गवीर हितेश बंडोपंत, नेहा चव्हाण, मल्हार वाघरे, सुषमा दाते , प्रद्नेश कानडे इत्यादी दुर्गवीर सदस्य देखिल उपस्थित होते...
