महाराष्ट्र वेदभुमी

एका आईचे स्वप्न साकार.. मुलगा भारतीय सैन्यदलात भरती.

रोहा प्रतिनिधी(नंदेश गायकर) : आजच्या युगात मुले प्रेमाच्या चक्रात गुंतलेले असताना काही ठराविक मुले अशी असतात की, त्यांना करिअर करण्याची धडपड असते... आईवडिलांनी आपल्या भरपूर कष्ट उपसलेले असतात त्यांच्या कष्टाचे चीज करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते सरकारी एखादा मोठा स्टेटससाठी खूप मेहनत घेतात आणि शेवटी जिंकतात...

  असाच एक रोहा तालुक्यातील चेनेरे गावचा सुपुत्र पारस कतारसिंग मानहस आपल्या आईंच्या स्वप्नासाठी धडपड करून भारतीय सैन्यदलात भरती होऊन पंजाब रेजिमेंटसाठी सिलेक्ट होऊन आपल्या गावचे नाव रोशन केले... आपल्या आईने पाहिलेले स्वप्न साकार केले...

 काल रोजी तारीख 10 सायंकाळी गावच्या त्याच्या मित्रमंडळींनी आणि गावच्या प्रतिष्ठित व्यक्तीनी त्याची जंगी मिरवणूक काढून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

 आपल्या मूलाच्या यशाबद्दल गर्व वाटणाऱ्या आईच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहत होते... आपला मुलगा देशसेवेसाठी जातोय ही अभिमानाची बाब असून त्याच्या आईच्या जीवनात सर्व सुख मिळाले असे तिला मनोमनी वाटत होते... कालच्या जंगी मिरवणूकमध्ये तिच्या आनंदाला पारावर न्हवता...

Post a Comment

Previous Post Next Post