मुंबईप्रतिनीधी:(सतिश पाटील)
मुलुंड विधानसभेतील नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ.. सस्नेह जय महाराष्ट्र! शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार, विभागप्रमुख श्री रमेशभाई कोरगांवकर,: महिला विभागसंघटक सौ. रश्मीताई पहुडकर यांच्या सहकार्याने ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ मुलुंड विधानसभेतील महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली...
शिवसेना शाखा १०८ चे शाखाप्रमुख व शिवसेवा प्रतिष्ठान मुलुंड चे अध्यक्ष माननीय श्री शैलेश धर्मराज पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7-30 ते 10 वाजेपर्यंत मुलुंड पश्चिम, लायन्स क्लब हॅाल , पहिला मजला, मुंबई येथे मुलुंड विधानसभेतील नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे..
प्रमुख पाहुणे,सौ.रश्मीताई पहुडकर- विभाग संघटकश्री. पुरुषोत्तम दळवी-विधानसभा प्रमुख सर्व आजी-माजी पदाधिकारी {महिला- पुरुष} मुलुंड विधानसभा
सदर कार्यक्रमात सर्व आजीमाजी शिवसैनिकांचा सत्कार व पदनियुक्ती करण्यात आली. उपस्थिताचे भाषण व प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. व आपल्या दिलेल्या पदाचे योग्य व जनहीतासाठी कार्य करू असे आश्वासन दिले. श्री सतीश पाटील (मुंबई पत्रकार) यांचाही सन्मान करण्यात आला पदाधिकाऱ्यांमधून अनेकांनी करोके वरती मधूर असा आवाजात गाण्याचा कार्यक्रम करून सर्वांची मने जिंकली. शेवटी अल्पोपराचा कार्यक्रम करून कार्यक्रम समारोप झाला.. आयोजक: शिवसेवा प्रतिष्ठान- मुलुंड
