महाराष्ट्र वेदभुमी

धक्कादायक: उभ्या असलेल्या वाहनाला कारची जोरदार धडक

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा गंभीर प्रश्न 

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक:-  तालुक्यातील खुमारी टोल प्लाझा येथे शुक्रवार (दि.१२) डिसेंबरला सकाळी १० वाजता भीषण अपघाताची घटना घडली... नागपूर-जबलपूर महामार्ग पोलीस वाहनांची थांबून चौकशी करीत असतांना उभ्या असलेल्या गाडीला मागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली... या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, दोन कारच्या भीषण अपघातात एका कारचालकाला गंभीर जखमी झाला असून तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत... सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही... या अपघातासंदर्भात वाहतूक पोलिसांची कार्यपद्धती, वाहक तपासणीचे निकष आणि सुरक्षिततेचे नियम यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे... प्राप्त माहितीनुसार, ओरिएंटल टोल प्लाझा परिसरात दररोजप्रमाणे महामार्ग पोलिस वाहनांची थांबवून चौकशी करीत होते... त्याचवेळी पोलिसांनी एमपी २० झेड २०६८ ही कार थांबवून चालक ओमकुमार यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी सुरू केली... ओमकुमार हे पोलिसांशी संवादात असतानाच मागून येणारी कार (एमपी २२ सीए ३९५७) अचानक वेगाने धडकली... प्रथम तिने ओमकुमार या चालकाला जोरदार धडक दिली आणि नंतर पुढे उभी असलेल्या कारवर जाऊन आदळली... या अपघातात ओमकुमार गंभीर जखमी झाले... ओरिएंटल टोल प्लाझा वैद्यकीय पथक तसेच चालक प्रवीण ठाकूर आणि पांडू वाघाडे यांनी तत्काळ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविले... किरकोळ जखमींवर उपचार सुरू आहेत... तर ओमकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे... अधिक तपास रामटेक पोलिसांकडून सुरू आहे...

Post a Comment

Previous Post Next Post