उदयसिंह उर्फ गज्जु यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
डि.सी. उभारल्यास अनेक समस्या लागणार मार्गी
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक:- मौदा विभागांतर्गत रामटेक उपविभागातील मनसर डी.सी. चे विभाजन करून शीतलवाडी (परसोडा) येथे नवीन डी.सी. मंजूर करण्यात यावी जेणेकरून येथील विद्युत संबंधीत अनेक समस्या मार्गी लागतील या उद्देशाने भाजपा नागपूर जिल्हा रामटेक ग्रामीण उपाध्यक्ष उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या मागणीच्या आशयाचे पत्र दिलेले आहेत... विशेष बाब अशी की मुख्यमंत्र्यांनी गज्जु यादव यांनी मांडलेल्या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित दखल घेत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना उचित निर्देश दिलेले आहे... गज्जू यादव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, मौदा विभागातील रामटेक उपविभाग कार्यालयांतर्गत अस्तित्वात असलेल्या मनसर डीसीच्या भौगोलिक विस्तीर्ण क्षेत्रफळामुळे तसेच ग्राहकसंख्या अधिक असल्याने महसूल वसुली तसेच विद्युत पुरवठा दुरुस्ती/देखभाल वेळेत करण्यासाठी मनसर डीसीचे विभाजन करणे अत्यावश्यक आहे... मनसर परिसर दाट जंगल व रामधाम, चोरबाहुली फॉरेस्ट सफारी, पेंच टायगर रिझर्व्ह यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांनी वेढलेला असल्याने आणि शीतलवाडी-परसोडा या ग्रामपंचायत अंतर्गत मोठी ग्राहक संख्या असल्याने शीतलवाडी येथे नवीन डी.सी. आवश्यक आहे... मनसर डी.सी. चे विभाजन करणे आवश्यक झाले असुन संदर्भीय पत्रांवये कार्यकारी अभियंता, मौदा विभाग यांनी विविध मुद्यांवर प्रस्ताव तयार करून मुख्य अभियंता म.रा.वि.वि.कं. लि. नागपूर यांचे मार्फत प्रस्ताव शासनास सादर केला असल्याचेही गज्जू यादव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे... करिता मौदा विभागांतर्गत रामटेक उपविभागातील मनसर डी. सी. चे विभाजन प्रस्ताव मंजूर करण्याबाबत संबंधितांना आपले स्तरावरून उचित निर्देश देण्यात यावेत अशी मागणी भाजपा नागपुर जिल्हा रामटेक ग्रामिणचे उपाध्यक्ष उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे...
