रायगड :- (नरेश पाटील): माणगाव हे ठिकाण प्रथमच भव्य सांस्कृतिक पर्वासाठी सज्ज झाले असून, 12 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान कोकण फेस्टिव्हल–2025 या अद्वितीय महोत्सवाचे आयोजन होत आहे... कोकणाची अस्सल परंपरा, खाद्यसंस्कृती, कला आणि मनोरंजनाचा अप्रतिम संगम या फेस्टिव्हलमध्ये अनुभवायला मिळणार आहे...
उद्घाटन सोहळा शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सांयकाळी 6.00 वा. ढोल–ताशांच्या गजरात पार पडणार असून यासाठी मा. सौ. अलका कुबल-आठले, मा. डॉ. निलेश साबळे, मा. मेघराज राजे भोसळे, अँड. राजीवजी साबळे, नगराध्यक्ष मा. सौ. शर्मिला सुर्वे यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत...
फेस्टिव्हलदरम्यान शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सादरीकरण, शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, काव्य-वाचन, गीतगायन, अभिनय स्पर्धा, लावण्यवती स्वाती पुणेकर यांचा लावणी महोत्सव, कोकण सुंदरी, रेकॉर्ड डान्स, बॉडी बिल्डिंग अशा अनेक आकर्षक कार्यक्रमांनी वातावरण रंगणार आहे... विशेष आकर्षण म्हणून सुपरहिट विनोदी नाटके “ऑल द बेस्ट” आणि भाऊ कदम यांचे “सिरीयल किलर” सादर होणार आहेत...
कोकणाच्या सांस्कृतिक वैभवाचा ब्रँड म्हणून माणगावाची ओळख अधिक बळकट करण्याचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.. या ऐतिहासिक महोत्सवासाठी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रायगड सांस्कृतिक कला मंडळ आणि आयोजक मंडळाने केले आहे...
