महाराष्ट्र वेदभुमी

खा.सुरेश म्हात्रे यांनी प्रस्ताव दिला ड्रिंम प्रोजेक्टबाबात रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांची भेट

मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील)

गावचा सरपंच.... श्री.विलास बबन पाटील ग्राम पंचायत भरोडी ता.भिवंडी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्प मुंब्रा देसई मार्गे भिवंडी तालुक्यातील भरोडी गावात कार शेड चे नियोजन करण्यात आले आहे.कार शेड मुळे गावातील सुरई फाटा अंजूर रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना अंजूर हायस्कूल येथे येण्यासाठी वेहेले गावातून यावं लागेल. विद्यार्थ्यांना व नागरिकांना ५ मी प्रवासासाठी १ तासाचा प्रवास करावा लागेल. गावातील सांड पाण्याचा निचरा होणार नाही. संपूर्ण गावाला नाहक त्रास होणार आहे.

सरपंच श्री. विलास बबन पाटील यांनी संपूर्ण गावाला एकत्र करून  भुयारी मार्गासाठी आंदोलन सुरु केले...सदर आंदोलनाला सर्व राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या.भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे, जेष्ठ नेते आर सी पाटील, श्री.अरुणकुमार पाटील, शेतकरी संघटना अंजुर दिवे, श्री.कुंदन पाटील,माजी खासदार , पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते व सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी झाले... खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला आणि लवकरच सरपंच व कमिटी ची दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांची भेट घेणार आहेत...

गावचा सरपंच कसा असावा हे विलास पाटील यांच्याकडून इतरांनी शिकावं. कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला नाही तर सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करतो येतो... गावाच्या समस्या सोडवता येतात हे दाखवून दिले... ग्रामपंचायत भरोडी, ग्रामस्तमंडळ भरोडी, महिला वर्ग, शाळेय विद्यार्थी यांचा आम्हाला अभीमान वाटतो...गावात अशीच एकता कायम ठेवावी...शेतकरी संघटना तुमच्या सोबत कायम राहील....जय भूमिपुत्र जय दि बा

Post a Comment

Previous Post Next Post