प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या स्मृतीला देशभरात अभिवादन करण्यात आले... शहरात आकाशझेप फाऊंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान, रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ब्लड फॉर बाबासाहेब अभियान, भारतीय बौद्ध महासभा, मनाम एकता मंच दुकानदार संघ रामटेक सामाजिक संस्था, यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ऐच्छिक रक्तदानातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शिबिरांत ५२ जणांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले... याप्रसंगी रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले... मान्यवर बिकेंद्र महाजन, ज्योती कोल्लेपरा, नितीन भैसारे, ऋषिकेश किंमतकर, सुमित कोठारी, राजेश किंमतकर, वैभव तुरक, सुनील खुरगे, सतीश सुरुसे, दीपा चव्हाण, शुभा थुलकर, पवन जाधव, मनीष खोब्रागडे, अमित अंबादे, डॉ. आशिष सांगोडे, पूनम अंबादे, महादेव सरभाऊ, राकेश साखरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमेध गजभिये, प्रशांत डहारे यांनी प्रयत्न केले...
