महाराष्ट्र वेदभुमी

वीर वाजेकर महाविद्यालयात ‘शाश्वत विकासाद्वारे धरतीमातेची काळजी’ राज्यस्तरीय कार्यशाळा

कांतीलाल पाटील : नवी मुंबई प्रतिनिधी 

 फुंडे,दि.१७ : जागतिक ओझोन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत विकासाद्वारे धरतीमातेची काळजी” या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन  प्राचार्य  डॉ. आमोद ठाक्कर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले तसेच ओझोनचा नाश करणाऱ्या CFC वायू निर्माण करणाऱ्या साधनांऐवजी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यशाळेत IQAC समन्वयक डॉ. राहुल पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांची ओळख करून दिली. डॉ. दिलीप काकविपुरे (BNN महाविद्यालय, भिवंडी) यांनी आपल्या पर्यावरणविषयक कामांद्वारे धरतीमातेची विद्यमान परिस्थिती स्पष्ट केली आणि ओझोन थराच्या ऱ्हासाची गंभीरता अधोरेखित केली. श्री. कुलदीप म्हात्रे (RKT महाविद्यालय, उल्हासनगर) यांनी जागतिक ओझोन दिनाचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, ओझोन थर कमी होण्याची कारणे आणि त्यावर उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच संस्था, समुदाय व वैयक्तिक स्तरावर करावयाच्या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले...

या कार्यशाळेला राज्यभरातून  सुमारे ११० विद्यार्थी  व प्राध्यापक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. डॉ. श्रेया पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. आयोजन समितीच्या सदस्या डॉ. रत्नमाला जावळे व डॉ. धरती घरत यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सक्रिय योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. राहुल पाटील यांनी केले...

ही कार्यशाळा पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यात आणि शाश्वत भविष्यासाठी ओझोन थराच्या संरक्षणातील व्यक्तींच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात अत्यंत यशस्वी ठरली...

Post a Comment

Previous Post Next Post