महाराष्ट्र वेदभुमी

राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली EVM विरोधात माणगावात सर्वपक्षिय जनआंदोलन.



जनआंदोलन बाबत दुसऱ्यांदा निवेदन.

जनतेला अभिप्रेत असलेल्या नवीन पारदर्शक निवडणूक प्रात्यक्षिक यंत्रणा; राजा भाऊ ठाकूर करणार उलगडा.

नवीन निवडणूक डेमोचे यंत्रणा पाहण्यास जिल्हाभरातून जनसागर माणगावात लोटणार. 

माणगांव  :- (नरेश पाटील): "निवडणुकीतील ईव्हियम यंत्रण हटाव, जुन्या सुवर्ण पद्दतील असलेल्या बॅलेट पेपर मध्येच पुढील सर्व निवडणुकी हाती घेण्यात यावी..." हा विषय हाती घेऊन काँग्रेस पक्षाचे माजी दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विरोधी पक्ष च्या पुढाकाराने माणगांव येते सोमवारी दि. ०९ डिसेंबर रोजी संपूर्ण एक दिवसीय आंदोलन पार पडणार आहे... तर याबाबत माणगांव प्रांत कार्यालयात गुरुवारी दि. ०५ डिसेंबर रोजी राजा भाऊ ठाकूर यांनी दुसरा अर्ज सादर केला ..तर या आगोदर जिल्हाधिकारी अलिबाग येते राजा भाऊ ठाकूर यांनी गेल्या महिना २६ नोव्हेंबर रोजी सादर केला होता... सदर दोन्ही अर्जात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हियम मशीनचे हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला आणी हीच कहाणी राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र (EVM) बाधित होऊन पराभूत झालेले आहेत... ही मतदान यंत्र EVM व VVPAT जो पर्यंत बंद होत नाहीत किंवा नवीन पर्याय प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्याही निवडणुका पार पडणार नाहीत व नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला जाईल असे मजकूर उल्लेख करून समाजाला/ जनतेला अभिप्रेत असलेल्या नवीन पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे मानस आहे... तर यासाठी सुमारे ३० × ३० लांबी रुंदीची हॉल/ खोली उपलब्ध करून दयावी व होणारे भाडे सरकारी तिजोरीत जमा करण्यास मी तयार आहे.. असे ही सदर अर्जात नमूद केले आहे... तर निवेदन सादर करते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गटाचे रायगडचे ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, माणगांव ता. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे, कार्यकर्ते फारुख परकार, रक्षित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पवार, तळा तालुक्यातील नामांकित ऍड. प्रितेश मेकडे सह आधी उपस्थित होते...

  दरम्यानाचा काळात सदर आंदोलन माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्ग रेल्वे स्टेशन जवळील एचपी पेट्रोल पंप जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात येत्या सोमवारी दि. ०९ डिसेंबर रोजी होणार आहे... तर सदर ठिकाणी गुरुवारी दि. ०५ रोजी दुपारच्या वेळेत राजा भाऊ ठाकूर, विलास सुर्वे तसेच फारुख परकार यांनी मैदानाची पाहाणी केली... 

दरम्यान सदर आंदोलनास जिल्ह्याभरातून हजारो लोक शामील होणार असल्याचे वार्तालाप करताना राजा भाऊ ठाकूर यांनी सांगितले...हे आंदोलन सर्वपक्षीय विरोधी पक्ष घटकामधील आहे.... तर सदर आंदोलनास उपस्थित तसेच पाठिंबा मिळावे याकरिता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय माजी मंत्री शरद चंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष नाना पठोळे, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रहार शक्ती संघटनेचे ओमप्रकाश बच्चू कडू, वसई चे हितेंद्र ठाकूर, शेकापचे भाई जयंत पाटील, ईव्हीयम बाधित अनेक पराभूत उमेदवार, रायगड जिल्हा बार असोसिएशनचे वकील संघटना, अनेक NGO संघटना, डॉक्टर्स संघटना तसेच नाना नामांकित व्यक्तिमत्व यांना पत्र पाठविल्याचे खास निदर्शनास आणून दिले...    

या दरम्यान राजा भाऊ ठाकूर यानी १९३ श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती... तर प्रचार दरम्यान मतदार बांधवांकडुन अभूतपूर्व पाठिंबा लाभला होता.., मात्र असे असतानाही त्यांना हार पत करावी लागेली.... तर अफाट पाठिंबा असतानाही पराभूत कस काय होऊ शकते ? अशी शका मनात असल्याने EVM मशीनचे छेडछाड असल्याशिवाय असे होऊ शकत नाही आणी हीच बोंब राज्यातील अनेक पराभूत उमेदवार यांचेही तेच म्हणणे असल्याचे लक्षात येताच राजा भाऊ ठाकूर यानी EVM चे विरोधात आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे... दरम्यान पारदर्शक निवडणूक होण्याकरिता राजा भाऊ ठाकूर यांनी एका आगळ्या वेगळ्या प्रक्रियेचे प्रात्याक्षिक पारदर्शक जनतेला आवडेल अशा पद्धतीचा एक डेमो सदर दिनी सादर करणार असल्याने ते पाहण्यासाठी अलोट जनसागर उसळणार असे विलास सुर्वे यांनी बोलताना सांगितले...

 दरम्यान जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर सभे ठिकाणी पासून चालत जाऊन पुढे कचेरी रोड मार्गी जाऊन प्रांत कार्यलय येते उपविभागीय अधिकारी यांना भेटून EVM/VVPAT मशीन हटवून त्या जागी जुन्या पद्धतीने असलेलत्या बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यात यावी तसेच माझा हा अर्ज महा महीम राष्ट्रपती, सुप्रीमकोर्ट, मुख्य निवडणूक अधिकारी, नवीदिल्ली आणि दूरदर्शन प्रसारित विभागाकडे रवाना करण्यात यावा म्हणुन सादर केलेल्या अर्जात विशेष उल्लेख केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post