पुगाव- खांब (नंदकुमार कळमकर): त्याग निष्ठा आणि सेवा तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या न्यायासाठी झटणारी राज्यातील नामांकित शिक्षक संघटना म्हणून नावलौकीक असलेली आदर्श शिक्षक समिती.महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, जिल्हा शाखा रायगड यांच्या वतीने "गुरुगौरव पुरस्कार सोहळा 2025" या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या सोहळ्यात जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक तसेच विविध स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना गुरूगौरव पुरस्कार देऊन मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तर हा सोहळा रविवारी ५ ऑक्टोबर २०२५ रोजी द.ग.तटकरे विद्यालय कोलाड येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी यावेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे पदाधिकारी तसेच रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. नामदार. अदिती तटकरे यांनी या संघटनेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी शिक्षक गुरुगौरव कार्यक्रमासाठी मंत्री अदितीताई तटकरे यांचे समवेत उपशिक्षणाधिकारी शेडगे, रोहा तहसिलदार किशोर देशमुख, संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष अजय कापसे, महिला जिल्हा अध्यक्षा सौ.अमिता बामणे सह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच गुरुगौरव पुरस्कारार्थी आदी सर्व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते...
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता केवळ शिक्षणाचा ध्यास आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना, योग्य तो न्याय मिळावा यासाठी तळागाळात, वाडीवस्तीवर काम करणाऱ्या गुरुजनांच्या कार्याचा सन्मान व्हावा, शिक्षकी पेशाचा मान, सन्मान वाढविणाऱ्या गुरुजनांना दरवर्षी 'गुरुगौरव' पुरस्काराने या आदर्श समितीच्या वतीने सन्मानित करण्यात येते.या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातून एक स्त्री शिक्षिका व एक पुरुष शिक्षक, तसेच जिल्हा स्तरावरील उर्दू विभागातून पुरुष शिक्षक व एक स्त्री शिक्षिका त्याचप्रमाणे दोन नगरपालिका व महानगरपालिका पनवेल क्षेत्रातून प्रत्यकी एक स्त्री व पुरुष शिक्षक यांना सन्मानित करण्यात येते... गेली तीन वर्ष हा उपक्रम जात आहे. तर यावर्षी मंत्री अदितीताई तटकरेंच्या शुभहस्ते रायगड जिल्ह्यात शैक्षणिक कार्या सह विविध स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुजनांना गुरूगौरव पुरस्कार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले...
यावेळी सौ. रुपाली गणेश भोबू, मधुकर ठका झोरे (अलिबाग)सौ. जान्हवी जयेश साजेकर, जनार्दन रामचंद्र बावधाने (सुधागड ) सौ. मंगला राजेंद्र पारील, मनोज काशिनाथ ठाकूर (पेण) कुमार हसुराम पाटील,सौ मिनल मंगेश ठाकूर (पनवेल) बालासाहेब लक्ष्मणराव दहिफळे,सौ. स्मिता भास्कर पाटील (कर्जत) जयेश देवजी महाडीक,सौ. साधना भानुदास दांगडे (रोहा ) संतोष सोनाप्पा येवतकर,श्रीम. मनीषा पांडुरंग जगताप(श्रीवर्धन)श्रीम. संगिता उदय खानावकर,चेतन रोहिदास मकू (मुरूड) सौ. वैशाली बापुराव खराडे,राजेंद्र शिवाजी दुर्गे (खालापूर) सौ. दिप्ती दिलिप भोईर,सुशिल सुदाम जाधव (महाड) सौ. चैताली किरण म्हात्रे, रितेश रमेश मोकल (उरण) नारायण बाबू ढेपे)श्रीम. अरुणा ऊमाजी भांडविलकर (माणगाव) सौ. संगिता बाबासाहेब आंबेडकर ,विश्वास मधुकर काणेकर (म्हसळा) राजू माणिक पठारे सौ. उमा अजित तारू (तळा)शाहीर नवनाथ आवारे श्रीम.पुनम शिवाजी पवार(पोलादपूर)उर्दू विभागातून रहमतुल्ला इसहाक बंदरकर (म्हसळा) गुलजार जैनुद्दीन दळवी (पनवेल) निलोफर अहमद इनामदार(तळा) तर नगरपालिका/ महानगरपालिका विभागातून वासिम जाफर सावरटकर न. (न.पा. रोहा) सौ. सुचिता सुनिल टेंगळे(न. पा. रोहा)श्रीम. तनुजा प्रभाकर दलाल , सुजित प्रभाकर म्हात्रे (पनवेल मनपा) या शिक्षकांना गुरूगौरव पुरस्कार मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला...
तसेच यावर्षी रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबददल प्रसाद साळवी, विनायक शिंदे व सौ.सुजाता मालोरे यांचे देखील ना. तटकरे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आले.शिक्षक गौरवा प्रमाणेच संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आपत्ती काळात मदतकार्य तसेच महाड पुरग्रस्त मदत, कोरोना काळात सुमारे २.५० लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत ना.आदितीताईच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच यावर्षी आलेल्या राज्य पूरआपत्तीमध्ये महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे सर्व सभासद आपल्या ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला.अशा सर्व उपक्रमांचे मंत्री अदिती ताई तटकरे यांनी कौतुक करत पुरस्कार पात्र सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तर शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे शेवटी सांगितले.व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या...
अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व स्वागताने करण्यात आली... तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नाईक, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजय कापसे, संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शेवटी जिल्हा कोषाध्यक्ष सुशांत येसवारे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने करण्यात आली...