महाराष्ट्र वेदभुमी

आझाद मैदानावर कुणबी समाजाचा एल्गार, मराठा आरक्षणाविरोधात सात जिल्ह्यातील कुणबी बांधव एकवटणार

कोलाड (श्याम लोखंडे) आम्ही जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत.कुणबी दाखला तसेच ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी कुणबी समाजाच्या वतीने जनाक्रोष आंदोलन मुंबई सह विशेषतः कोकणसह सात जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव उद्या गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाच्या आंदोलनाला विशेषतः जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळी पडून सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी मध्ये घ्यावे यासाठी तातडीने GR काढला आहे. असे करणे म्हणजे मूळ कुणबी समाजाचा तसेच ओबीसींचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. यामुळे कुणबी सह ओबीसी समाजाचे पिढ्यानपिढ्या अपार नुकसान होणार असून, सरकारने हा GR ताबडतोब रद्द करावा व  विविध मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तर्फे कोकणातील मुंबई, मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,या सात जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव तसेच ते अबाधित ठेवण्यासाठी कुणबी बांधवांचा संघ अध्यक्ष अनिल नवगने यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर मोर्चा आंदोलन काढण्यात आला असून यासाठी हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई संघाचे अध्यक्ष अनिल नवगने तसेच उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी सात जिल्ह्यातील तमाम कुणबी बांधवांना केले आहे...

सरकारने सरसकट मराठ्यांना आरक्षण जाहीर करताच आंदोलनातून सदरील सात जिल्ह्यातून  एकाच दिवशी स्थानिक पातळीवरून राज्याचे मुख्यमंत्री,पहिले उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत मराठा आरक्षणाच्या विरोधात सारे कुणबी बांधव एकटवत आरक्षण आमच्या हक्काचा असा नारा देत कुणबी समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेट जीआर रद्द व इतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांना देखील हे निवेदन देण्यात आले...

तर आज  ९ ऑक्टोबर रोजी जन्माने आणि कर्माने कुणबी असलेल्या कुणबी समाजाच्या वतीने सरकारकडून होत असलेल्या अन्याय विरोधात आझाद मैदानावर ना भूतो ना भविष्य असा हा मोर्चा आंदोलन ठरणार असल्याचे दिसून येत आहे,तर आंदोलनासाठी बुधवारपासूनच प्रमुख पदाधिकारी यांच्या गाड्यांचे ताफे आझाद मैदानाकडे जय्यत तयारीसाठी निघालेले आहेत तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचना देखील आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक समाज बांधव यांना सात जिल्ह्यातील तालुका स्थरावर तसेच प्रत्येक विभाग ग्रुप मध्ये बैठका घेऊन देण्यात आल्या असून अधिक अधिक कुणबी समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक ग्रुप अध्यक्ष यांच्या कडून आयोजित बैठकीतून करण्यात आले आहे...

प्रतिक्रिया

संघर्षासाठी कुणबी समाजाच्या वतीने एकजुटीचा निर्धार करण्यात आला असून उद्या आझाद मैदानावर होत असलेले आंदोलन हे भूतो ना भविष्य असे ठरणार आहे मराठा समाजाला शासनाने दिलेले आरक्षणास कुणबी समाजासह ओबीसींचा तीव्र विरोध आहे. आणि सरकारने त्वरित तो जी आर रद्द करावा अशी प्रमुख मागणीसाठी आज आझाद मैदानावर मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे तसेच घटना बाहा न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा. ओबीसी विद्यार्थाना १००% शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे. जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा देवून त्यास पंधराशे कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद शासनाने लवकरात लवकर करावी,लोकनेते शामराव पेजे न्यासासाठी सरकारने ५० कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा,पेजे समिती व म्हसकर समितीच्या अहवालातील प्रलंबित मागण्यांची त्वरीत पूर्तता करण्यात यावी,कोकणातील बहुसंख्य कुणबी हे गेली अनेक दशके खोतांच्या जमिनी कसत असून सदर जमिनी अजूनही त्यांच्या नावे झालेल्या नाहीत. किंबहुना त्यांची कुळ म्हणून नोंद सुद्धा झालेली नाही. या बेदखल कुळांसंदर्भात आपण ठोस निर्णय घेवून त्यांना न्याय द्यावा, तसेच जन्माने आणि कर्माने कुणबी असून ते आर्थिक दृष्ट्या मागास आहेत जातीचा दाखला शासनाच्या काही जाचक अटीशर्तीमुळे मिळत नसल्याने शिक्षणात त्यांच्या मुलाबाळांचा मोठा नुकसान होत असल्याने हा जाणाक्रोष मोर्चा सरकारला जाग आणण्यासाठी आझाद मैदानावर काढण्यात आले असल्याचे संघ अध्यक्ष अनिल नवगने आणि उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post