राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी वनविभागाला लगावली फटकार
पवनी येथे माणव वन्यजिवन सहजिवन चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- जंगलात वन विभागाकडून सागवान लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परिणाम स्वरूप जंगल भागात गवत फार कमी प्रमाणात उगवत असते त्यामुळे या गवतावर अवलंबून असणारे वन्य तृणभक्षी प्राणी हे चाऱ्याच्या शोधात गाव वस्तीकडे, शेतशिवाराकडे येत असतात व त्यांच्या मागे वन्य हिंस्त्र प्राणी सुद्धा शिकारीच्या शोधात त्या वन्य तृणभक्षी प्राण्यांच्या मागे येत असतात आणि यातूनच मानव व वन्य हिंस्त्र प्राणी यांचा संघर्ष होत असतो. यातूनच मानवी जीवाचा बळी जात असून गेल्या एक-दोन वर्षात या भागात अशा मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या आहेत तेव्हा वन विभागाने जंगलात सागवान लागवडीचे महापाप करू नये असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी वनविभागाला सुनावले. आदिवासीबहुल भागातील पवनी येथे ' गोटुल ' सभागृहात रविवार (दि.०५) ला मानव वन्यजिवन सहजिवन चर्चासत्र व कार्यशाळेत वन विभागाला संबोधून म्हटले. ते बोलत होते की, वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात मृत्यू होतो त्या लोकांच्या घरच्या लोकांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे प्रस्ताव वन विभागाचे अधिकारी कर्मचारी शासनाकडे लवकर पाठवत नाही तेव्हा यानंतर जो अधिकारी व्यवस्थित काम करणार नाही अशा अधिकाऱ्यांची गय केल्या जाणार नाही. अशी फटकार लावली. जंगलात ग्रासलँड क्षेत्र वाढविण्यास सांगुन दिवसेंदिवस वाघांची संख्या वाढत असल्याची जाणीव करुन दिली. आपल्या चुकीमुळे आपला मृत्यु होणार नाही, ही दक्षता लोकांनी घ्यावी असे यावेळी उपस्थित लोकांना आवाहन केले. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्या शांता कुमरे यांनी शेतीलगतच्या जंगल भागाला कुंपण करावे अशी वन विभागाला मागणी करीत हंगामी मजुरांची संख्या वाढवून त्यांचे वेतन हे महिन्याच्या महिन्यात दिले गेले पाहिजे अशी मागणी येथे उपस्थित उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास यांना केली. उपस्थित सुनील करकरे यांनी मानव-वन्यजीव संघर्षावर एक बायोग्राफी सादर केली. मानव व वन्यजीव संघर्ष कशा पद्धतीने निर्माण होतो याबद्दल माहिती सादर केली. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास व पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी ' हिंस्त्र वन्य प्राण्यांपासून मानवाचे संरक्षण ' या विषयावरील चर्चासत्रात लोकांच्या विविध प्रश्नांचे समाधान केले. कार्यक्रमाचे संचालन पवनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी तर आभार प्रदर्शन रामटेक चे सहाय्यक वनसंरक्षक गोविंद लुचे यांनी केले. कार्यक्रमाला उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, माजी पं.स.सभापती चंद्रकांत कोडवते, संजय नेवारे, देवलापार पोलीस स्टेशन ठाणेदार नारायण तुरकुंडे, रामटेक तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष उर्फ बाल्या मासुरकर, माजी सरपंच उमेश भांडारकर, पवनी चे वनपरीक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, रामटेक वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे, वनाविभागाचे विविध वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, कर्मचारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
आपण मिळून काम करू - डॉ. व्यास
या भागातील शेतकऱ्यांवर, लोकांवर काय परिस्थिती ओढवली आहे याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे. आपण सर्व मिळून काम करू, तुम्ही सुचवा आम्ही तुमच्या सोबत आहो असे सांगत उपवनसंरक्षक डॉक्टर विनिता व्यास यांनी जनवन विकास योजनेत या भागातील काही गाव समाविष्ट आहे, तेव्हा उपजिवीकेसाठी तथा माणव - वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी या योजनेतील निधी वापरून त्यातून काही रोजगार सदृश कामे उभे करू, जेणेकरून यातून लोकांना आर्थिक हातभार लाभेल व ते जंगलातून मिळणाऱ्या तेंदु पत्ता, मोहफुल आदी. बाबींसाठी जंगलात जाणार नाही व मानव - वन्यप्राणी संघर्ष टळण्यास मदत होईल असे उपस्थित लोकांना सांगितले...