रायगड रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभागातील तसेच आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आदिवासी समाजाचे नेते दया पवार यांनी तटकरेंना धक्का देत तसेच मंत्री गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रविवारी ५ ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला...
ऐन स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी तटकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत रोहा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवली आहे...
माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम श्री पांडुरंग मंगल कार्यालय पुगाव खांब येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते पार पडला यावळी रायगड जिल्हा शाखा प्रमुख प्रमोद घोसाळकर रोहा तालुका प्रमुख अँड मनोजकुमार शिंदे, निलेश वारंगे,तसेच विभागीय शाखा प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थीत पक्ष प्रवेश कर्ते दया पवार, रोठ ग्राम पंचायत सरपंच गीता ताई मोरे ,यांचा सह त्यांचे असंखे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठी देत पक्ष प्रवेश केला.तर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत रोहा तालुक्यासह जिल्ह्यात अधिक पक्षाला बळकटी मिळेल आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात विकासाला चालना मिळेल असे सांगितले...