प्रतिनिधी शहानवाज मुकादम/रोहा...
रोहा:(दि:०५ ऑक्टोबर)रोहा परिसरातील जनतेच्या आरोग्यसेवेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ चा ५० खाटांच्या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडला...
या रुग्णालयाच्या माध्यमातून रोहेकरांना अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे रुग्णालय आता सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आसुन, रोहा आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहेत.
या रुग्णालयात आयसीयू व ट्रॉमा केअर युनिट, २४ तास आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स तसेच हृदयरोग, मेंदूविकार, कर्करोग उपचार, किडनी स्टोन लेझर शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सेवा, हाडांचे व मणक्याचे शस्त्रक्रिया विभाग, नेत्ररोग उपचार, डायलिसिस, सोनोग्राफी, एक्स-रे इत्यादी उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत...
सदर च्या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, मा. आ. श्री. अनिकेत तटकरे, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि डॉ.निशिकांत पाटील (सिव्हील सर्जन),डॉ. मनिष विखे (जिल्हा अरोग्य अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती...कार्यक्रमाचे संचालक डॉ. रत्नदीप गवळी, डॉ.तन्वी पंदारे,डॉ. रोहन पंदारे, डॉ. राजेश टेलर होते...
या उद्घाटन सोहळ्यात सौ. वरदा सुनील तटकरे, मा. सौ. वेदांती तटकरे, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होतं...