माणगाव – (नरेश पाटील) : दि. ४ ऑक्टोबर सायंकाळी उशिरा पुणे–दिघी राज्य महामार्गावरील तम्हिणी घाटात गंभीर अपघात झाला. महिंद्रा कंपनीच्या कार वाहन (एमएच-१४-केयू-०५०८) माणगाव दिशेने घाट उतरतानाच्या दुसऱ्या वळणावर दोनदा पलटी मारल्याचे समजते...
प्राथमिक माहितीप्रमाणे, या वाहनामध्ये शिवणे, कात्रज (पुणे) येथील सहा प्रवासी होते. या सहा प्रवाशांपैकी चार गंभीर जखमी झाले, तर दोन जण अपघातातून थोडक्यात वाचले आणि अपघातस्थळाच्या मागे उभे राहिले. गंभीर जखमींमध्ये दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे...
जखमींना सुमारे ८ वाजता POSCO महाराष्ट्र स्टील कंपनीच्या ICU रुग्णवाहिकेने सहाय्यक जिल्हा रुग्णालय, माणगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. आपत्कालीन विभागात त्यांना डॉ. ऋतिकेश इंगोले, CMO (Casualty Medical Officer) यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत...
आपत्कालीन फोन मिळाल्यानंतर POSCO कडून तातडीने ICU रुग्णवाहिका चालक – अमोल नारायण पानसरे तैनात केली गेली, आणि जखमी प्रवाशांचे जीवन वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली...
आमच्या संवादसाधकाने नोंदवले की, जेव्हा POSCO रुग्णवाहिका सायरन वाजवत जलद गतीने सरकारी रुग्णालयाकडे जात होती, तेव्हा रुग्णाल येते रुग्णवाहिकेच्या चालकाकडून अपघाताबाबत थेट माहिती मिळवली. POSCO कडून वेळेवर दिलेली मदत आणि नेहमी परिसरातील गावकऱ्यांसाठी केलेली सेवा कंपनीच्या सामाजिक जबाबदारीबद्दल पुन्हा एकदा अधोरेखित करते...
सध्या जखमींच्या स्थितीवर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी लक्ष ठेवून आहेत...