महाराष्ट्र वेदभुमी

सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवर शासनाकडूनच टांगती तलवार

शासनाने भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा ७ ऑक्टोंबरला आंदोलन..

राज्य कामगार मंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक -: नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची भरती प्रक्रिया मागील सण २०२२ पासून प्रलंबित आहे. मंडळात सुरक्षा रक्षकांची भरती व्हावी याकरिता मंडळाच्या अध्यक्षांनी वारंवार तसे प्रस्ताव मंडळामार्फत सह आयुक्त कामगार (माथाडी) कामगार आयुक्त यांचाकडे अंदाजित ०९ ते १० वेळेस पाठविले आहे. या परंतु एकाही प्रस्तावाची संबंधीतांनी दखल घेतली नाही. तेव्हा शासनाने सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया विनाविलंब राबवावी अन्यथा येत्या ७ ऑक्टोंबरला संविधान चौक, नागपूर येते एकदिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सुरक्षा रक्षक संघटनेने दिला आहे. या आशयाचे एक निवेदन संघटनेच्या वतीने राज्य कामगार मंत्री आशिष जयस्वाल यांना देण्यात आले. यावर जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मंडळामध्ये नोंदीत आस्थापना तसेच नवीन नोंदीत झालेल्या आस्थापना यांच्याकडून वारंवार सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावे याकरिता मंडळाकडे पत्रव्यवहार केलेले आहे. परंतु मंडळाकडे प्रतिक्षा यादीवर सुरक्षा रक्षक उपलब्ध नसून मंडळ सुरक्षा रक्षक पुरवठा करण्यास असक्षम आहे. यामागचे एकमेव कारण म्हणजे शासन भरतीची मंजूरी देत नसल्याने अनेक आस्थापना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत देण्यात आलेले सुरक्षा रक्षकाची सेवा मागे घेत आहे. उदा. पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, भारतीय प्रबंध संस्थान, मिहान, येथे भरती होत नसल्याने मंडळाकडे असलेले इतर सुरक्षा रक्षक यांचावर सुद्धा बेरोजगारीचे सावट उद्भवले आहे. तेव्हा शासनाने सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया विनाविलंब राबवावी. त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक संघटनेची कामगार विभागातील अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी आजी कामगार मंत्री यांचा समवेत बरेचदा मुबंई मंत्रालय येथे याविषयीची बैठक सुद्धा पार पडली. त्यावेळेस कामगार मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरती प्रक्रियेची तात्काळ मंजुरी देण्यास कळविले होते मात्र कामगार विभागातील अधिकारी दिलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करित नसल्याचे आजपर्यंत दिसून येत असल्याचे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. निवेदन देताना उपस्थित सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ सलग्न भारतीय मजदूर संघांचे कार्याध्यक्ष सतीश दुनेदार, सुधीर सेलोकर, प्रवीण रंगारी, शिवराम कनोजे, चंद्रकांत लबडे, पुरुषोत्तम चव्हाण, दिनेश मालकुथे, सुरेंद्र गोणे, अनिल हुलके, रोशन कोल्हे ई. सदस्य उपस्थित होते...

विलंबामुळे बेरोजगारी वाढतीवर

नागपूर तसेच विदर्भातील हजारो बेरोजगार युवकांनी सुरक्षा रक्षक नोकरी करिताच्या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने आवेदन केले आहे. भरती प्रकियेचा या विलंबामुळे तरुण पिढीला रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे सुरक्षा रक्षकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अश्या परिस्थितीत जर मंडळाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही तर खाजगी एजन्सीचे किंवा महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) सुरक्षा रक्षकांचे वास्तव्य हळूहळू वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही, यामुळे मंडळातील कार्यरत हजारोच्या संख्येने सुरक्षा रक्षक बेरोजगार होऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post