मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील): मुंब्रा पोलिस ठाण्यात लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रंगेहात पकडला...मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून २५ हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याने ५० हजारांची लाच मागितली होती, तडजोडीअंती २५ हजार रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले...
मुंब्रा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव ( ४९ ) यांची नेमणूक आहे... त्यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे... मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे... या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून सहायक पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी त्याच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती...
तडजोडीनंतर ही मागणी २५ हजार रुपयांवर आली. २४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी ही लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती...
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक; २ लाखांचा पहिला हप्ता घेताना कारवाई…
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ सप्टेंबर रोजी झालेल्या पडताळणीत भालेराव यांनी ही मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले... यानंतर २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १३.१५ वाजता, मुंब्रा पोलीस ठाण्यामधील रायटर कक्षामध्ये तक्रारदाराकडून २५,००० रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले... त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवगज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली...
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास विभागाशी तात्काळ संपर्क साधावा...