उरण दि ५(विठ्ठल ममताबादे): खालापूर तालुक्यातील हरेश पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांकरिता स्वतःच्या घरातील धान्य व आपल्या सहकारी मित्रांकडून जीवन आवश्यक वस्तू कपडे चटया झाडू बिस्किट गहू तांदूळ आटा शालेय उपयोगाच्या वस्तू वह्या इत्यादी वस्तू गोळा करून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुंबई येथे सुपृत केले. प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रायगड वरून आलेल्या मदतीचा उल्लेख विशेषतेने केला, रायगड मध्ये आजही माणुसकी शिल्लक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले शिकवण शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये आलेलं प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगडचा मावळा छाती पुढे करतो. रायगड आपत्कालीन परिस्थितीत कधी मागे राहणार नाही असे खालापूर तालुका अध्यक्ष हरेश पाटील यांनी यावेळी सांगितले, रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातून मदत गोळा करण्यात आली व पक्ष कार्यालयाकडे सुपृत करण्यात आले.