कोलाड (श्याम लोखंडे): लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 चा ऑक्टोबर सेवा सप्ताह लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर या सेवा सप्ताहात डिस्ट्रिक्ट मधून रिजन,झोनसी सलग्न असलेले सर्व लायन्स क्लब मधील मेंबर्स एकत्रित येऊन 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवले जातात..
गेली पाच वर्षे लायन्स क्लब ऑफ कोलाड वतीने विविध उपक्रम राबविले जातात या अनुषंगाने तसेच लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 चे जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ ला. संजीवजी सूर्यवंशी, पहिले उपप्रांतपाल पी एम जे एफ ला. प्रवीण सरनाईक, दुसरे उपप्रांतपाल पी एम जे एफ ला. विजय कुमार गणात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डिस्ट्रिकचे प्रमुख पदाधिकारी रिजन चार चे रिजन चेअर पर्सन ला.गिरीश म्हात्रे झोन थ्री च्या झोन चेअर पर्सन सूक्ष्मिता शिट्यालकर यांच्या नेतृत्वाखाली कोलाड क्लब चे अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोलाड परिसरात या सप्ताहाच्या निमित्ताने सलाहाबाद प्रमाणे सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतिक,अशा विविध प्रकारचे उपक्रम या क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आले...
कोलाड क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप,माजी अध्यक्ष नरेश बिरगावले, डॉ. मंगेश सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली क्लबचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सेक्रेटरी अलंकार खांडेकर, खजिनदार गजानन बामणे, उपाध्यक्ष डॉ श्याम लोखंडे यांच्या सह सर्व लायन मेंबर्स यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले...
तर सदरच्या सेवा सप्ताहात नेत्र तपासणी शिबिर व मोती बिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी, शालेय शैक्षणिक साहित्यांचे मराठीतून इंग्रजी सोप्या भाषेतील पुस्तक वाटप, गरजूंना अन्नधान्य व कपडे पांघरूण म्हणून ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच महिलांसाठी नवरात्रौत्सवात फनी गेम खेळ पैठणीचा,महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी,वृद्धाश्रमात फळे वाटप त्याच बरोबर कॅन्सर, हृदय रोग,मधुमेह, तसेच विविध आजारांवर विशेष तज्ञांच मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक साहित्यांचे वाटप आणि गुणवत्तेसाठी मौलिक मार्गदर्शन, वृक्ष रोपण,असे विविध उपक्रम या क्लबच्या माध्यमातून करण्यात आले.तर या सर्व उपक्रमाचे कौतुक तसेच त्यांनी केलेले उपक्रम यांचे प्रदर्शन 8 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रांतपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आयोजित कार्यक्रमातून त्यांचे कौतुक करत विशेष गौरव करण्यात येणार आहे.कोलाड लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि लायन लेडी यांनी विशेष मेहनत घेतली.