सत्यप्रसाद आडाव : चणेरा प्रतिनिधी: जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला मुरुड जंजिरा किल्ला अखेर तब्बल पाच महिन्यांनी पर्यटकांना पाहण्यासाठी तुला करण्यात आला असल्याचे शुभेच्छुक विभागाने सांगितले आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या बोट प्रवासी वाहतूक व स्थानिक व्यावसायीक यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
25 मे पासून जंजिऱ्याचे किल्ल्याचे दरवाजे दरवर्षी बंद करण्यात येतात कारण हा अभ्येद्य किल्ला भर समुद्र असल्यामुळे या किल्ल्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रवेश करता येत नाही. खवळलेला समुद्र उंच उंच लाटा तसेच वेगवान वारा यामुळे या किल्ल्यात प्रवेश करण्यात अशक्य असते. पावसाळ्यामध्ये या किल्ल्यामध्ये झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढत असतात, दरवर्षी ही झाडेझुडपे पुरातत्व विभागातर्फे साफसफाई केल्यानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. यावर्षी सतत पडणारा पाऊस यामुळे ही साफसफाई करण्यास सतत अडथळे आल्याने हा किल्ला बद्दल पाच महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. अशी माहिती पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी दिले.