चणेरा प्रतिनिधी सत्यप्रसाद आडाव : रायगड जिल्ह्यातील प्रमुख अलिबाग–पेण मार्ग आज ठप्प झाला... शेतकरी कामगार पक्षाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरवस्थेविरोधात पोझरी पोलिस चौकीजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले.. शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेत्या ऍड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रस्त्यावर बसल्याने अलिबाग–मुंबई, आणि अलिबाग–नागोठणे या सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती..मात्र या ठिकाणी आलेल्या रुग्णवाहिकांना आंदोलन कार्यांनी मार्ग मोकळा करून दिला...
या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या... या आंदोलनामुळे पुन्हा एकदा रस्त्यांची खड्डेमय अवस्था चर्चेत आली आहे...
