महाराष्ट्र वेदभुमी

हुंड्याच्या दुष्कृत्याला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा

विद्याची हत्या केल्याचा आरोप...

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- अजनी येथील एका २३ वर्षीय विवाहित विद्या लिल्हारे हिचा शिवर्‍यातील विहिरीत पडुन मृत्यु झाला... हि घटना सोमवारी उघडीस आली असुन पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर मृत्यदेह रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला... मृताच्या नातेवाईकांच्या आरोपावरून पती आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांवर हत्या करुन मृत्यदेह विहीरीत फेकण्याचा आरोप करण्यात आला आहे....

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नवविवाहित विद्या लखपती शेंडे रा. मोहाडी जि.भंडारा हिचा विवाह अमोल लिल्लारे रा.अजनी तहसील रामटेक यांच्याशी ९ एप्रिल २०२१ रोजी झाला होता... दोघांना दिड वर्षाची मुलगीही आहे...

लग्नानंतर विद्याला ४ लाख रुपयांची मागणी होऊ लागली... मात्र मागितलेले रुपये न दिल्याने विद्याला मारहाण व मानसिक छळ करणे सुरु झाले होते... याप्रकरणी भंडारा न्यायालय मोहाडी पोलीस स्टेशन, महिला सेल, येथे केस सुरु होती...

सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास विद्या शेतात गेली होती... उशिरापर्यत ती घरी परतली नाही... विद्याचा पतीने विद्याचा भावाला फोन करुन विद्या बेपत्ता झाल्याची माहीती दिली... अजनीला विद्याचे नातेवाईक पोहचल्यावर विद्याचा शोध करण्यात आला, दरम्यान विद्या शेतशिवार्‍यात मृतावस्थेत दिसली. घटनेची माहीती रामटेक पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचुन मृतदेह बाहेर काढण्यात आला... रात्री १० वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्नालयात पाठविण्यात आला...

मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता... मात्र मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी ३ जणांविरुद्ध भा. न्या. सं. ८०, ८५, ३(५) कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, यामध्ये पती अमोल लिल्लारे, भासरे महेश लिल्लारे , जावू धनवंती महेश लिल्लारे यांना अटक करण्यात आली आहे,  सदर आरोपींना सहा डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन पुढील तपास पीएसआय सापावार करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post