हजारोंच्या संख्येने दि.बा समर्थक उपस्थित होते.
मुंबई प्रतीनीधी :( सतिश पाटील)
भिवंडी-जासई मार्गावर हजारोंचा सहभाग, विमानतङळ नामकरणासाठी निर्धार स्वर्गीय लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भिवंडी ते जासई या मार्गावर “दि.बा. मानवंदना कार रॅली निरोप समारंभ” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भिवंडी, ठाणे, मुबंई, पालघर, वसई, नवी मुंबई, रायगड येथून हजारो नागरिकांनी उपस्थित राहून स्मृतींना अभिवादन केले...
काररॅली चे नियोजन खासदार :सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा )यांनी केले , खासदार: संजय दि.पाटील, माजी आमदार राजूदादा पाटील, उपनेते ,समिती अध्यक्ष:दशरथ पाटील, अतुलजी दि.पाटील दिबांचे सुपुत्र सहभाग आणि सर्व पक्षीय नेते तसेच दि.बा. साहेब समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संपूर्ण वातावरण घोषणाबाजीने दणाणून गेले. “नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावेच” ही एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
नेत्यांनी ठाम इशारा दिला की,दोन वेळेस राज्य सरकारने नाव घोषित केले पण केंद्र सरकार कडून होकार मिळतनाही. “सरकारने मागणी मान्य केली नाही तर विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही.” तसेच येत्या पंधरवड्यात याहून मोठे आंदोलन उभारून सरकारला झुकवण्याचा निर्धार मा.खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमातून व्यक्त करण्यात आला...
दि.बा. पाटील हे शेतकरी, कामगार, आदिवासी व सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेते होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विमानतळाला त्यांचे नाव देणे ही न्याय्य आणि जनतेची खरी मागणी असल्याचे सर्व वक्त्यांनी स्पष्ट केले.
आजचा निरोप समारंभ हा आगामी संघर्षाचा इशारा असून, “लढा विजय मिळेपर्यंत सुरूच राहील” असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला..