महाराष्ट्र वेदभुमी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत खैरेखुर्दची ग्रामसभा संपन्न;

ग्रामसभेत पहिल्यांदाच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित...

शहानवाज मुकादम/रोहा

रोहा:तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात आज दि:१७/०९/२०२५ रोजी आयोजित ग्रामसभेत शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करून अंमलबजावणी करणे बाबत व छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि:१७ सप्टेम्बर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि: ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत मध्ये " सेवा पंधरवडा " साजरा करणे बाबत शासन निर्णय वाचन करून चर्चा करण्यात आली...

 राज्य शासनाच्या पुढाकारातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर राबविले जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत खैरेखुर्दच्या कार्यालयात आयोजित ग्रामसभेत मा. सरपंच श्री मुजम्मील गीते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला...

 तसेच ग्रामविकास अधिकारी श्री गजानन सोनुले यांनी अभियानाच्या अनुषंगाने शासन परिपत्रकाचे वाचन करून उपस्थितांना ७ मुख्य घटक तथा विषयावर माहिती दिली...

 यावेळी विविध मान्यवरांनी अभियानातील उपक्रमांबाबत विस्तृतपणे सांगितले...

अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत. या घटकांशी निगडित विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली...

  अभियानाच्या कालावधीत विविध उपक्रम राबवून ग्रामपंचायतींना गुण देण्यात येणार असून त्याआधारे ग्रामपंचायत, पुरस्कार वितरित केले जाणार आहेत...

  सदर सभेत पहिल्यांदाच महिलावर्गाने मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती, या सभेत पालक अधिकारी तथा न्हावे केंद्र प्रमुख पाबरेकर सर, ग्रामपंचायत खैरेखुर्द चे उप सरपंच जुबैर धनसे, सदस्या नर्गीस बडे, शैला वाघमारे, रिना कोंडे, माजी सरपंच पांडुरंग कोंडे, महिला बचत गट, आंकुश वाघमारे, तंटामुक्त अध्यक्ष आरुण कोंडे, पोलीस पाटील अब्दुल रउफ पित्तू, मुख्याध्यापक तारीख सर, फकीर सर, सइद सर, सर्व आंगणवाडी सेविका, ईफ्तिखार धनसे,आमिनुद्दिन धनसे, शहबाज धनसे,खैरेखुर्द चे ट्रस्टी अध्यक्ष अब्बास मुकादम, सेक्रेटरी अब्दुल हमीद गीते व अदि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...

Post a Comment

Previous Post Next Post