महाराष्ट्र वेदभुमी

माणगावात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक; पक्ष बळकटीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा.


माणगाव (नरेश पाटील) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव येथे तळा व माणगाव तालुक्यांची संयुक्त काँग्रेस पक्ष आढावा बैठक शनिवारी, ३ मे रोजी सायंकाळी उशिरा हॉटेल वक्रतुंड येथे पार पडली. या बैठकीस रायगड जिल्हा वरिष्ठ काँग्रेस काँग्रेस उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा ज्येष्ठ काँग्रेस सचिव डॉ. नरेंद्र सिंग, मच्छीमार रायगड काँग्रेस जिल्हा सेल अध्यक्ष मार्थांड नकवा, ईतर नेते जसे किरीट पाटील, वैभव पाटील, लंकेश ठाकूर, माणगाव तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुका काँग्रेस अध्यक्ष शरद भोसले तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागताने करण्यात आली. तालुकाध्यक्ष विलास सुर्वे यांनी आपल्या मनोगतात काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी पदयात्रा, संघटनबांधणी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज यावर भर दिला. त्यांनी पक्षाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. यानंतर विविध कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी पक्षाच्या भूतकाळातील वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी वरिष्ठांनी नेतृत्व करावे, असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रदेश निरीक्षक राजेश शर्मा यांनी सुमारे १५ मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पक्ष बळकटीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी खासदार राहुल गांधी व राज्याचे नव्याने निवडून आलेले प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कसा पुन्हा सुवर्णकाळाकडे वाटचाल करू शकतो, याविषयी माहिती दिली. रायगड जिल्ह्यात लवकरच काँग्रेस कॅडर प्रशिक्षण, गांधी विचारधारा शिबीर, 'हर घर भेटीगाठी' अभियान, जुने मतदार संपर्क मोहीम राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांना विश्वासात घेऊन काँग्रेस पक्षाला बॅरिस्टर अंतुले यांच्या काळासारखा सुगीचा काळ पुन्हा देण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी भाषणाची सांगता केली. कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी राजेश शर्मा यांची इंग्रजीत मुलाखत घेतली. यावेळी माणगाव शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील चव्हाण, इंदापूर विभाग अध्यक्ष महेश जाधव,तळा ता. पर्यावरण सेल चे अध्यक्ष मंदिप सकपाळ, बॅरिस्टर ए.आर. अंतुले फौंडेशन अध्यक्ष इब्राहिम बंदरकर, शशिकांत पवार, फारुख परकार, निसार फिरफिरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post