महाराष्ट्र वेदभुमी

रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये महावाचन उत्सव २०२४-२५ स्पर्धेचे आयोजन


रोहा प्रतिनिधी भाग्येश घोसाळकर.

घोसाळे:-रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये महावाचन उत्सव २०२४-२५ स्पर्धेचे आयोजन केले होते...

 रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा या सर्व तालुक्यातील  शाळांमध्ये महावाचन उत्सव हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

रोहा तालुक्यातील घोसाळे को.ऐ.सो.माध्यमिक विद्यालय घोसाळे येथे महावाचन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... इयत्ता नववी ते बारावी या गटामध्ये रोहा तालुकास्तरावर कुमारी श्रद्धा संजय भगत हिने प्रथम क्रमांक मिळविला... 

 तसेच या यशामुळें शिक्षण विभागामार्फत कुमारी श्रद्धा हिस प्रमाणपत्र व पुढील शिक्षणाकामी उपयोगी पुस्तकांचा संच देऊन गौरव करण्यात आला... तो पुस्तकांचा संच श्रद्धा कडून को.ऐ. सो माध्यमिक विद्यालय घोसाळे यांस देण्यात आला... 

दरम्यान श्रद्धा संजय भगत या विद्यार्थिनीने रोहा तालुकास्तरीय महावाचन उत्सवात उल्लेखनीय असे यश संपादन करून कोकण एज्युकेशन सोसायटी संस्थेचे व को.ऐ. सो माध्यमिक विद्यालय घोसाळे शाळेचे नाव संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात उज्वल केल्याबद्दल घोसाळे विभागीय पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक तसेच नातेवाईकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post