८४ दिवसांत कार ने २७ राज्यांमधून २२,५३० किमी चा प्रवास
रामटेकमध्ये धाडसी महिलांचे भव्य स्वागत
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- भारत के रंग नारी के संग या संकल्पनेतून धैर्य, जिद्द आणि नारी शक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडवत रामटेक येथील डॉक्टर अंशूजा किंमतकर आणि लक्ष्मी माथरे यांनी कारने ऐतिहासिक भारत परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. या महिलांनी स्वतः वाहन चालवत तब्बल ८४ दिवसांत २७ राज्यातून प्रवास करत २२ हजार ५३० किलोमीटरच्या भारत परिक्रमा कठीण प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करत इतिहास घडविला आहे. आम्ही रोज पहाटे साडेपाच ते सहा वाजता दरम्यान प्रवासाला सुरुवात करीत असायचो. रोज शंभर-दीडशे ते आठशे किलोमीटर प्रति दिवस आम्ही अंतर प्रवासादरम्यान पार केले. सहासी प्रवासनंतर २३ डिसेंबर रोजी रामटेक मध्ये परतल्या यावेळी शहरांमध्ये त्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात आले. साहसी प्रवासाला त्यांनी ०१ आक्टोंबर २०२५ रोजी रामटेक येथून "भारत परिक्रमा भारत के रंग नारि के संग" या संकल्पनेतून सुरुवात केली होती. महिलांनी स्वतः वाहन चालवत संपूर्ण प्रवास पूर्ण केला. या भारत परिक्रमाचा मुख्य उद्देश नारी सक्षमीकरणाच्या संदेश देणे आणि भारतीय विविध संस्कृती, परंपरा व भौगोलिक वैवीध्य अनुभवणे हा होता. आम्ही स्वतःच अन्न शिजवून जेवत असल्याचे महिलांनी सांगितले. लद्दाख तथा इतर काही राज्यातील रस्ते फार खराब असल्याने आम्हाला वाहन चालवायला खूप समस्या निर्माण होत होती. लद्दाख व नागालँड येथे आम्हाला पोलिसांची मदत सुद्धा मिळाली होती. या प्रवासादरम्यान त्यांनी उमलिंगला (२० हजार फूट) तर खारदूंगला (१८ हजार फूट) यासारख्या जगातील सर्वात उंच मोटारीयोग्य रस्त्यावरून प्रवास करीत दुर्गम दर्या पार केल्या. हिमालयातील शून्य अंश तापमान, बर्फाच्छादित धोकादायक रस्ते तर थार वाळवंटातील प्रखर उष्णता, या प्रवासादरम्यान त्यांनी २७ राज्ये, ०७ आंतरराष्ट्रीय सीमालगतचे भाग आणि ०३ समुद्री मार्ग पार केले. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क विरहित भागातून केवळ आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी प्रवास यशस्वी रित्या पूर्ण केला. डॉक्टर अंशूजा किंमतकर ( वैद्यकीय व्यावसायिक, लेखिका व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस धारक ) आणि लक्ष्मी माथरे( उद्योजिका व सामाजिक कार्यकर्ता) की अनेक प्रसंगी जीवावर बेतण्याची परिस्थिती होती मात्र आत्मविश्वास आणि ध्येयाशी असलेली निष्ठा यामुळे प्रवास यशस्वी झाला. नागपूरच्या झिरो माइल व रामटेक च्या गांधी चौकात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले सृष्टी सौंदर्य ग्रुप मातृका फाउंडेशन पत्रकार संघ यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या सन्मान केला ही भारत परिक्रमा आजच्या पिढीतील महिलांसाठी धैर्य स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे...
एका वर्षापासून पैशाची जुळवाजुळव
भारत परिक्रमा करायची आहे तर त्यासाठी फार खर्च येईल असे आम्ही गृहीत धरले होते आणि त्यानुसार आम्ही तब्बल एक वर्षापासून पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती असे अंशूजा किंमतकर व लक्ष्मी माथरे यांनी सांगितले तसेच वाहनासाठी व आर्थिक मदतीच्या आशेपोटी आम्ही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला भारत परिक्रमेच्या प्रवासासाठी एक लक्ष रुपयांची मदत केली असेही या धाडसी महिलांनी माहिती देतांना सांगितले.
