प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- नगरपरिषद रामटेक च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल तब्बल १८ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नुकताच रविवार (दि२१) डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात काँग्रेस पक्षाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून पक्षाचे सात उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. यामध्ये अभिषेक तेजराम डाहारे यांची नगरसेवक पदावर वर्णी लागलेली आहे. अभिषेक डाहारे यांना काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक १० (अ) महात्माफुले वार्ड रामटेक येथून उमेदवारी दिली होती. या प्रभागामधून भाजपा उमेदवार सौ पद्मा अजाब ठेंगरे ४१८ मते, शिवसेना उमेदवार ईश्वर माणिक सव्वालाखे ४०२ मते यांच्या पराभव करत विजय संपादन केला. अभिषेक तेजराम डाहारे यांना एकूण ५७४ मते मिळाली. त्यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्ता मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवडणुकीत अभिषेक यांना प्रभागातून भरघोस मतदाराच्या प्रतिसाद मिळाला असून ते १५६ मतांनी विजयी झाले. नवनिर्वाचित नगरसेवकाला प्रभागातील मतदारांनी व समर्थकांनी अभिनंदन करून सामाजिक व विकासत्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रभागात विकासासाठी अभिषेक डाहारे सक्रिय भूमिका बजावतील आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देतो....
