मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचा थकबाकीदारांना अल्टीमेटम
५ लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता जप्त अनेक मालमत्तांना ठोकले ' सिल
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- शहरातील सन २०२५ -२०२६ या वित्तीय वर्षामध्ये रामटेक नगरपरिषद हद्दीतील थकित मालमत्ता धारक यांना अधिपत्र बजावून वारंवार घरभेटी देवूनही मालमत्ता धारक यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे वसुलीचा भरणा केलेला नाही... वसुली पथके व जप्ती पथकाव्दारे थकित मालमत्ता धारकावर धडक कारवाई करून मालमत्ता सील, जप्ती करणे, जप्त केलेला माल अटकाव करणे इत्यादी नियमोचित करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे... अशी महिती रामटेक नगर परिषदेचे मुखाधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली... बुधवारी मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी नगरपरिषदेच्या सिलींग पथकाला सोबत घेत शहरातील ३ स्थावर मालमत्तांवर कारवाईचा बडगा उगारला... या मालमत्तांवर तब्बल ५ लाख रुपयांहून अधिक कर थकीत असल्याची माहिती नगर परिषदेच्या सिलिंग पथकाने दिली आहे... त्याचप्रमाणे केवळ मोठ्याच मालमत्ता नव्हे, तर ज्यांच्याकडे १ लाख रुपयांपेक्षा जास्त कर थकीत आहे, अशा सर्व मालमत्ता धारकांना अंतिम लेखी सूचना बजावण्यात आल्या आहेत... मुख्याधिकाऱ्यांमार्फत या सर्व मालमत्तांचे 'अधिपत्र' (वॉरंट) काढण्यात आले असून, कोणत्याही क्षणी त्यांच्यावरही जप्तीची कारवाई होऊ शकते... नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी आणि शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आपला थकीत मालमत्ता कर त्वरित भरून सहकार्य करावे... सदर ' सिलींग मोहीम' आपल्या सक्तीच्या कार्यप्रणालीमुळे नेहमीच चर्चेत्त असलेल्या रामटेक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या मार्गदर्शनात प्रशाषकिय अधिकारी प्रवीण सरगर यांचेसह सुरेश क्षीरसागर, साहिल खिचर, मनोज चिंटोले, झनक रघुवंशी यांनी राबविली...
पाच दिवसांची मुदत, अन्यथा लिलाव
जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांच्या धारकांना प्रशासनाने शेवटची संधी दिली आहे... पाच दिवसांच्या आत थकीत कराचा भरणा न केल्यास, या मालमत्तांचा कायदेशीररीत्या जाहीर लिलाव करण्यात येईल, असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे... या कारवाईमुळे शहरातील मोठ्या कर थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे...
कर वसुली पथकाचे टप्प्याटप्प्याने नियोजन
◼️कार वसुली करता विशेष सहा पथकांची नेमणूक...
◼️एक लक्ष वरील थकीत मालमत्ता कर असलेल्यांवर आतापर्यंत जप्तीची कारवाई करण्यात आली...
◼️२३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी, पन्नास हजार थकीत मालमत्ता कर असलेल्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे तर २६ फेब्रुवारी ते तीन २० हजार वरील थकबाकी असलेल्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात येणार आहे... तीन मार्च ते ३१ मार्च यादरम्यान सदर जप्त केलेल्या मालमत्तेच्या कायदेशीररित्या लिलाव करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे...
