राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत टप्पा-२ मधील विविध प्रस्तावित विकासकामांची राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी शनिवार (दि.२१) फेब्रुवारीला प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी गडमंदिर परिसर विकासकामे, यात्री निवास उभारणी, अंबाळा तसेच नारायण टेकळी परिसर विकास आदी कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठिकाणी भेट देऊन कामांची सद्यस्थिती तपासली व गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्णत्वासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. पाहणी दरम्यान रामटेक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) पराग ठमके, गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळ नागपूरचे मुख्य अधिकारी विजय इंगोले, उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत, उपविभागीय अभियंता (सा.बां.वि.) सुहास अल्लेवार, उपविभागीय अभियंता (सा.बां.वि.) किरण पोकळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते...
