महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ(भारत) राज्याध्यक्ष निवडणूक 95% मतदानासह ऐतिहासिक ठरली!

"लोकशाहीच्या एका नव्या अध्यायाला सुरूवात" 

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने राज्याध्यक्ष पदाची निवडणूक थेट मतदानाद्वारे घेऊन लोकशाही व पारदर्शितेचा आदर्श निर्माण केला आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेली ही निवडणूक पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली... विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप(Social Media) माध्यमातून पार पडलेल्या या प्रक्रियेत राज्यातील सर्व पत्रकार सभासद व उपसमित्यांचे सक्रिय सभासद यांनी सहभाग नोंदविला आणि तब्बल 95 टक्के मतदानाची नोंद झाली...

राज्याध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते... १) शंकरसिंह ठाकूर(निशाणी:- पेन 🖋️) आणि २)विष्णू कंकाळ( निशाणी:- माईक🎤 ) यांच्यात चुरशीची लढत रंगली... राज्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याने ही निवडणूक संघटनेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली... निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिंदे व विनोद परमार यांनी अत्यंत जबाबदारीने कार्यभार सांभाळत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली...

95 टक्के मतदानामुळे नक्की विजयी कोण होणार? याबाबत पत्रकारितेतील दिग्गजांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे... उमेदवारांसह मतदारांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे...

दिनांक: १मार्च २०२६ रोजी मालेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात नव्या राज्याध्यक्षांची अधिकृत घोषणा होणार असून, तोपर्यंत निकाल गुप्त ठेवण्यात येणार आहे... या ऐतिहासिक निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांना भरभरून मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा- पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत(पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख)

Post a Comment

Previous Post Next Post