महाराष्ट्र वेदभुमी

कपुर बावडी परिसरात स्वच्छता व संवर्धन मोहीम

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक -: ऐतिहासिक कपूर बावडी परिसरात कॅम्प चेरी फार्म चमुने नुकतीच स्वच्छता व संवर्धन मोहिम राबवली आली... दरम्यान परिसरातील गाळ, कचरा व झाडाझुडपांची साफसफाई करून बारवेल पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित रूप देण्यात आले... नुकतीच येथे अंतिम स्वच्छता पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास पारंपरिक दिव्यांनी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला... हा उपक्रम राज्यव्यापी ‘बारवांवर दीपोत्सव’ मोहिमेचा भाग असून, महाराष्ट्रातील एकूण ४४ ऐतिहासिक बारवांवर सहस्रदीपांनी उजळवून जलवारशाची आठवण जागवण्यात येत आहे... विदर्भातील ९, मराठवाड्यातील १०, पश्चिम महाराष्ट्रातील ९, कोकणातील १२ आणि उत्तर महाराष्ट्रातील ४ अशा विविध विभागांतील बारवांचा यात समावेश आहे... स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, दुर्गसंवर्धन गट, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले... जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान व जबाबदारीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे... कपूर बावडी येथे साजऱ्या झालेल्या दीपोत्सवातून केवळ प्रकाशोत्सवच नव्हे तर आपल्या प्राचीन जलसंस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची सामूहिक चळवळही अनुभवायला मिळाली असल्याचे चमुकडुन सांगण्यात आले... या मोहीमेसाठी नगरसेवक सुमीत कोठारी यांनी साहित्याची मदत केली... मोहीमेमध्ये  रजनी खंते यांच्या मार्गदर्शनाखाली मनीष मख, संदेश दांडेकर, राहुल कुमार, ओमप्रकाश, विवेक ठाकूर, तुषार काळे, विकी सोनवणे, शरद आकरे, सुब्रत कुमार जेना, संताना मारक्विन, दीपक हरिनखेडे, उल्हास बोतारे, शिरीष देशमुख, नितेेश दाभणे, धनराज चदंनबटवे, अमित, सुरेश, संस्कार, भावेश आणि अनिकेत यांसह अनेक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले...

Post a Comment

Previous Post Next Post