महाराष्ट्र वेदभुमी

भेंडखळच्या जे एम बक्षी गोदामातील लोकल लेबरना भरघोस पगारवाढ.

कामगारनेते रवी घरत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ७ हजार रुपये वेतनवाढीचा करार संपन्न

उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे): भेंडखळच्या जे एम बक्षी गोदामातील लोकल लेबरना भरघोस पगारवाढ झाली आहे... कामगारनेते रवी घरत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ७ हजार रुपये वेतनवाढीचा करार संपन्न झाला असून या वेतनवाढीच्या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.उरणच्या भेंडखळ गावाच्या हद्दीत वसलेल्या जे एम बक्षी सी एफ एस प्रकल्पाच्या सदगुरू कृपा फॉर्वर्डस च्या लोकल लेबर कामगारांना डॅशिंग कामगार नेते रवी घरत यांच्या नेतृत्वाखालील द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून सुमारे ७ हजार रुपायांची भरघोस पगारवाढ मिळवून देण्यात आली आहे. द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेचे डॅशिंग कामगार नेते रवि घरत यांच्या माध्यमातून शनिवारी हा वेतन करार करण्यात आला आहे. हा वेतन करार संपन्न होत असताना अतिशय कडक भूमिका घेत कामगार नेते रवी घरत यांनी दाखवून दिले की न्हावा शेवा परिसरात तुम्ही जर कामगारांच्या विरोधात पावले उचलणार असाल तर तुमच्यशी प्रसंगी दोन हात करण्याचे देखील या निमित्ताने सांगण्यात आले होते. त्याच अनुषंगाने असिस्टंट कामगार आयुक्त पनवेल यांना हा करार कशाप्रकारे संयुतीक आहे समजावून सांगून हा करार करण्यात आला. कामगारांना जे हवे त्या पेक्षा जास्त देण्याचा सातत्याने प्रयत्न रवी घरत यांच्या वतीने करण्यात येत असते आणि त्याचाच प्रत्यय या कराराच्या निमित्ताने आला आहे... असिस्टंट लेबर आयुक्तांना हा करार कसा कामगारांच्या हिताचा आहे हे समजावून सांगत त्यांच्या दालनातच या करारावर त्यांची सही घेण्यात आली त्याचा फायदा येथील सर्व लोकल लेबर आणि सुपरवायझर यांना मिळणार आहे... या वेतन करारावर सदगुरू कृपा फॉर्वर्डसच्या वतीने किशोरशेठ कडू यांनी तर कामगार नेते रवी घरत यांनी कामगारांच्या वतीने सह्या करीत का करार तडीस नेला आहे... कामगार नेते रवी घरत त्यांच्या सातत्याने कामगारांची बाजू अगदी रोखठोकपणे सहाय्यक कामगार आयुक्तांपर्यंत मांडण्याच्या द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेच्या बेधडक भूमिकेमुळेच या संघटनेकडे कामगारांचा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणातील ओघ वाढताना दिसत आहे. केवळ न्हावा शेवाच नाही तर पनवेल, खालापूर, रसायनी येथून देखील अनेक कंपन्यांमधील कामगार हे रवी घरत यांच्या कामगार संघटनेकडे आकर्षित होऊ लागले असल्याचे चित्र सध्या कामगार क्षेत्रात दिसू लागले आहे... या निमित्ताने सर्व कामगारांनी कामगार नेते रवी घरत यांचे आभार मानले आहेत... विविध क्षेत्रातील कामगारांनीही रवि घरत यांच्या आक्रमक नेतृत्वाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post