मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील): दिल्ली उच्च न्यायालय बार असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या.."Fight for justice Award 2025" नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात संपूर्ण देश परदेशी गाजलेल्या रामदास जनार्दन कोळी विरुद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सिडको व ONGC यांच्या विरोधात लढल्या गेलेला हा लढा इतिहासात अजरामर झाला त्याची नोंद ही दिल्ली येथे घेऊन 2013 साली पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिका आणि याचिकाकर्ते रामदास जनार्दन कोळी यांचा यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला... प्रकृतीच्या कारणास्तव ते या सोहोळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत...
एक प्रतिनिधी म्हणून मला या सत्कार सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले याबद्दल मी आमच्या टीमचे आभार व्यक्त करतो...
हा लढा अनेक अर्थांनी अपवादात्मक असा आहे. कुठल्याही धंदेवाईक वकिलांची मदत न घेताच आपल्या मातृभाषेत लढला गेला भांडवल फक्त सच्चाई आणि इमानदारी ज्याची दखल राष्ट्रीय हरित लवाद पुणे मुख्य न्यायाधीश श्री किनगावकर व श्री अजय देशपांडे यांनी घेत मच्छिमारांना नैसर्गिक न्याय मिळवून दिला... त्याचबरोबर वकील देण्याची तयारी देखील दर्शविली त्यामुळे कोळी समाज त्यांचे कायम आभारी राहतील...
पैशाचा माज आणि अहंकार नतमस्तक झाला. न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास दृढ झाला कारण सत्याचा विजय झाला... महाराष्ट्र व संपूर्ण भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले...
2015 साली न्यायालयाने 1630 प्रकल्प बाधित कुटुंबांना सुमारे 95 कोटी 19 लाख रुपये देण्याचा आदेश पारित केला परंतु, सदर प्रकल्पधारक सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली... JNPA प्रशासनाने 2022 रोजी पुन्हा 110 हेक्टर पारंपारिक मच्छिमार क्षेत्रात भराव घालण्यास सुरुवात केली व त्यास सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका ( दिलीप कोळी, नंदकुमार पवार व परमानंद कोळी) दाखल करण्यात आली...
त्यानंतर JNPA प्रशासनाने 2015 साली दाखल करण्यात आलेले civil appeal बिनशर्त मागे घेत 1630 बाधित कुटुंबांना 99,20,40,766 असे व्याजासह परत केले... अजून ongc, 20%, सिडको 10% या अनुषंगाने जवळपास 80 ते 85 कोटी रुपये येणे बाकी आहे... यासाठी काय पावले उचलावीत हे आमची टीम निर्णय घेईल...
श्री रामदास जनार्दन कोळी, श्री रमेश भास्कर कोळी, श्री दिलीप कोळी व प्रियांका रमेश कोळी यांनी निर्णायक भूमिका बजावली त्यामुळे त्यांचे त्रिवार अभिनंदन... समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम या अनुषंगाने झाले व पारंपारिक मच्छिमारांचा आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा भविष्यात अधिक तीव्र होईल...
