महाराष्ट्र वेदभुमी

डिसेंबरचे होणारे आंदोलन आचारसंहिते मुळे तूर्तास स्थगित! मात्र पुढील आंदोलन थेट मंत्रालयावर

 


मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील) : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी मानकोली ते नवी मुंबई विमानतळ पर्यंत 22 ते 24 डिसेंबर तीन दिवसाची पायी दिंडी दिंडी मोर्चा आयोजन खासदार मा.सुरेश म्हात्रे( बाळ्या मामा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते मात्र मनपा निवडणुकीच्या आचारसंहिता राज्यभर लागू झाल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून आचारसंहिता संमताच हे आंदोलन पुन्हा सुरू करू आणि थेट मंत्रालयावर आंदोलन करू अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.सुरेश म्हात्रे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे... यावेळी निलेश पाटील, धीरज कालेकर, गिरीश सळगावकर यांच्यासह संघर्ष समितीची पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते... नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासाठी ठाणे, भिवंडी,रायगड, पालघर, मुंबई नवी, कल्याण,मुंबई उपनगर या पाचही सागरी जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र, सर्व पक्षीय व संघर्ष समितीच्या वतीने खासदार मा.सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली 22 डिसेंबरला पायी दिंडी मोर्चा ची हाक दिली होती. या आंदोलनाची सर्व तयारी झाली असून आंदोलनाला भूमिपुत्राकडून मोठ्या प्रतिसाथ मिळाला आहे. मात्र मनपा निवडणुकीची आचारसंहिता  लागल्याचे कारण पुढे करून पोलिसांची आंदोलनासाठी परवानगी नाकारले असल्याचे हे आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आले असून आचारसहिता संपल्या नंतर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येणार असून मंत्रावरती धडक मोर्चा नेणार, 25 डिसेंबर रोजी स्थानिक भुमिपुत्राची मागणी दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी होती पण आजपर्यंत ही मागणी मान्य केली नाही... पण नाव देताच नवी मुंबई विमानतळाची विमान सेवा सुरू होणार असल्याने त्याचा निषेध म्हणून पाचही जिल्ह्यातील प्रत्येक गावात निषेध आंदोलन सर्व मिळून करणार  असल्याची माहिती यावेळी खासदार मा.सुरेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमातून दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post