रोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
; बहुसंख्य प्रभागांवर राष्ट्रवादीचा झेंडा
रोह्यात भाजपने 25 वर्षांनी पुन्हा खाते उघडले, प्रभाग क्रमांक 9 मधून रोशन चाफेकर विजयी
रोहा - प्रतिनिधी :- रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने सत्ता कायम राखली आहे... नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले... मागील 2016 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले त्यांचे वडील समीर जनार्दन शेडगे यांना केवळ 6 मतांनी पराभव पत्करावा लागला होता...
आज झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना 8586 मते तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमदेवार शिल्पा अशोक धोत्रे यांना 3891 मते मिळाली, एकूण 12708 मतदान झाले असून 231 मतदारांनी नोटाला मतदान करणे पसंत केले....
रोहा नगर पालिकेत भाजपने 24 वर्षांनी पुन्हा खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 9 मधून तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू चाफेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केले आहे... तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले असून त्यांच्या याच प्रभागातील उमेदवार सुप्रिया जाधव या विजयी झाल्या आहेत... त्यांच्या या विजयात पक्षापेक्षाही शिल्पा धोत्रे व अशोक धोत्रे यांनी या प्रभागात केलेल्या कामाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे...
या निवडणुकीतील बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, एका प्रभागात बिनविरोध विजयही मिळाला आहे... एका प्रभागांमध्ये उमेदवार पराभूत झाले असले, तरी एकूण निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेला स्पष्टपणे दिसून आला आहे...
प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक 1 अ :
राष्ट्रवादी विजयी – नीता महेश हजारे
प्रभाग क्रमांक 1 ब :
राष्ट्रवादी विजयी – प्रशांत कडू
प्रभाग क्रमांक 2 अ :
राष्ट्रवादी विजयी – फराह पानसरे
प्रभाग क्रमांक 2 ब :
राष्ट्रवादी विजयी – राजेंद्र जैन (बिनविरोध)
प्रभाग क्रमांक 3 अ :
राष्ट्रवादी विजयी – अफ्रिन रोगे
प्रभाग क्रमांक 3 ब :
राष्ट्रवादी विजयी – अरबाज मणेर
प्रभाग क्रमांक 4 अ :
राष्ट्रवादी विजयी – स्नेहा अंबरे
प्रभाग क्रमांक 4 ब :
राष्ट्रवादी विजयी – अहमद दर्जी
प्रभाग क्रमांक 5 अ :
राष्ट्रवादी विजयी – आलमास मुमेर
प्रभाग क्रमांक 5 ब :
राष्ट्रवादी विजयी – महेंद्र गुजर
प्रभाग क्रमांक 6 अ :
राष्ट्रवादी विजयी – गौरी बारटक्के
प्रभाग क्रमांक 6 ब :
राष्ट्रवादी विजयी – महेंद्र दिवेकर
प्रभाग क्रमांक 7 अ :
राष्ट्रवादी विजयी – प्रियांका धनावडे
प्रभाग क्रमांक 7 ब :
राष्ट्रवादी विजयी – रवींद्र चाळके
प्रभाग क्रमांक 8 अ :
राष्ट्रवादी विजयी – संजना शिंदे
प्रभाग क्रमांक 8 ब :
राष्ट्रवादी विजयी – महेश कोलटकर
प्रभाग क्रमांक 9 अ :
शिवसेना विजयी – सुप्रिया जाधव
प्रभाग क्रमांक 9 ब :
भाजपा विजयी – रोशन चाफेकर
प्रभाग क्रमांक 10 अ :
राष्ट्रवादी विजयी – पूर्वा मोहिते
प्रभाग क्रमांक 10 ब :
राष्ट्रवादी विजयी – अजित मोरे
या निकालांमुळे रोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले आहे... नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत... विजयानंतर राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला...
निकालानंतर वडील -लेक दोघेही रडले....
नऊ बर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष समिर शेडगे यांनी ६ मतांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक गमावली होती, तेव्हापासूनच त्यांच्या मनाची घालमेल त्यांची लेक वनश्री व कुटुंबियांनी पाहिली होती, किंबहुना ती रोहेकरांनी सुद्धा अनुभवली होती... रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर बाप - लेक दोघांना ही अश्रू अनावर झाले.. एकमेकाला मिठी मारत दोघांनी अश्रूंना वाट मोकळी केली...
