महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक नगराध्यक्षपदी बिकेंद्र महाजन विराजमान

 


रामटेक नगरपरिषदवर शिवसेनेच्या भगवा 

निवडणुकीत पार्टीला मिळालेले गुण

⏩शिवसेना २० पैकी-०८

⏩ काँग्रेस २० पैकी-०७

⏩भाजपा २० पैकी-०५

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक :- नगरपरिषद रामटेक च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवार (दि.२१) डिसेंबर रोजी लागला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या रामटेक नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शिवसेना (शिंदे गटाचे)  उमेदवार आणि माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन हे तब्बल ५७९ मते घेऊन रामटेक नगरपरिषदच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले, असून नगरसेवक पदी शिवसेनेचे ०८, काँग्रेसचे ०७ तर भाजपचे ०५ उमेदवार निवडून आलेले आहेत. त्या अनुषंगाने रामटेक मध्ये यासर्व पक्षाच्या विजयी उमेदवारांनी विजय रॅली काढून आनंद साजरा केला. रामटेक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून बिकेंद्र महाजन, काँग्रेसकडून रमेश कारमोरे, भाजपकडून ज्योती कोल्हेपरा तर अपक्ष म्हणून दामोदर धोपटे व आकाश ढोबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये शिवसेनेचे बिकेद्र महाजन यांना ५२०१ मते, काँग्रेसचे रमेश कारामोरे यांना ४७२२ मते, भाजपच्या ज्योती कोल्हेपरा यांना ३१८९, अपक्ष उमेदवार दामोदर धोपटे यांना १५३ तर आकाश ढोबळे यांना ११० मते मिळाली. यामध्ये शिवसेनेचे बिकेंद्र महाजन हे नगराध्यक्ष पदासाठी ५७९ मतांनी निवडुन आले...

प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी निवडुन आलेले उमेदवार

 १-अ-रजत गजभिये ७४७ भाजप

 ब- दीक्षा शेंदरे  ५९२ शिवसेना                 

२-अ-पंकज लिल्हारे ४३२ शिवसेना  

ब-शितल गजभिये ४८९ काँग्रेस

३-अ शालिनी महाजन ५३० काँग्रेस 

 ब प्रभाकर खेडेकर ५८८ भाजप

४.अ-विनिता आष्टनकर ४९० काँग्रेस

ब- सुमित कोठारी ७६४ शिवसेना 

५.अ- सुरेखा माकडे ७३४ शिवसेना 

 ब-अलोक मानकर ५६५भाजप 

६-अ-लक्ष्मी अहिरकर ७९६भाजप 

ब- माणिक ताकोत ६४९ काँग्रेस 

७-अ- भूमिका सहारे ६३८ शिवसेना

ब-विश्वास पाटील ६६९ शिवसेना

८.अ- पार्वती उईके ५४८ काँग्रेस

 ब-अंशुल देशमुख ६१३ काँग्रेस 

९-अ-पद्मा अंबादे ३७९ शिवसेना

ब- रोशन चापले ३६३ शिवसेना 

१०-अ- अभिषेक डहारे ५७४ काँग्रेस 

ब- कविता मुलमुले ८१७ भाजप

Post a Comment

Previous Post Next Post