निरीक्षक राजेश शर्मा यांच्या दौऱ्यात राजाभाऊ ठाकूरांच्या नेतृत्वात
रायगड (नरेश पाटील): काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने राज्य काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन साकपाळ यांनी निरीक्षक म्हणून नेमलेले माजी मुंबई महापौर राजेश शर्मा हे रायगड दौऱ्यावर आले असून, त्यांनी रविवारी ५ मे २०२५ रोजी श्रीवर्धन तालुक्याला भेट दिली. या दौऱ्यात कोकणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्व. आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी त्यांचे भव्य स्वागत केले...
श्रीवर्धनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीचे प्रदर्शन करत शर्मा यांचे जोरदार स्वागत केले. ..शहरात सर्वत्र काँग्रेसचे झेंडे, फलक आणि स्वागतबॅनर लावण्यात आले होते. श्रीवर्धन काँग्रेसचे उपाध्यक्ष इम्तियाज कोकाटे यांनी पुष्पगुच्छ व शाल अर्पण करून शर्मा यांचे स्वागत केले...
दौऱ्याच्या निमित्ताने रोहा, तळा, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यांतील काँग्रेस अध्यक्ष व कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी इम्तियाज कोकाटे व राजाभाऊ ठाकूर यांनी श्रीवर्धनमधील पक्षाच्या कार्याची सविस्तर माहिती निरीक्षक शर्मा यांना दिली...
राजेश शर्मा यांनी आपल्या भाषणात सर्वांचे स्वागत करत राजाभाऊ ठाकूर यांचे विशेष कौतुक केले आणि ते म्हणाले, “राजाभाऊ ठाकूर हे अत्यंत लोकप्रिय नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यामुळे माझे निरीक्षणाचे कार्य अधिक सुलभ झाले आहे. हे श्रीवर्धन म्हणजे स्व. अ.र. अंतुले यांची भूमी आहे. त्यांच्या आणि स्व. मधुकर ठाकूर यांच्या कार्याचा वारसा राजाभाऊ ठाकूर समर्थपणे पुढे नेत आहेत.”
शर्मा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्तियाज कोकाटे, गणपत गमरे, मनोज जाधव, दिनेश खैरे, शंकर मलकार, सज्जाद सरकार, संदीप चाळके, प्रमोद पवार, अनंत कुर्वतकर, उर्मिला जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली...या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट होण्यास चालना मिळणार असल्याचे संकेत मिळाले...
